(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Yashpal Arya : भाजपमध्ये लोकशाही उरली नसल्याचं सांगत उत्तराखंडचे मंत्री यशपाल आर्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Yashpal Arya : उत्तराखंडचे मंत्री यशपाल आर्या आणि त्यांच्या मुलाने भाजपला सोडचिठ्ठी देत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पुढच्या वर्षी उत्तराखंडच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.
नवी दिल्ली : उत्तराखंडचे वाहतूक मंत्री आणि भाजपचे बडे नेते यशपाल आर्या यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपमध्ये आता अंतर्गत लोकशाही नावाचा प्रकारच उरला नसल्याचं सांगत त्यांनी सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढच्या वर्षीच्या सुरुवातीलाच उत्तराखंडच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे राज्य आपल्या हाती कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला यशपाल आर्याच्या कॉंग्रेस प्रवेशामुळे जोरदार धक्का बसल्याचं समजलं जातंय. (Uttarakhand Minister Yashpal Arya join Congress).
यशपाल आर्या यांनी सोमवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि राहुल गांधीची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याची माहिती काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं. यशपाल आर्या यांच्यासोबत त्यांच्या मुलानेही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये अधिकार केवळ काही लोकांच्या हातात असून अंतर्गत लोकशाही राहिली नसल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेसमध्ये अंतर्गत लोकशाहीला मोठं महत्व असल्याने आपण या पक्षात प्रवेश करत असल्याचं ते म्हणाले.
Shri @RahulGandhi welcomes Shri Yashpal Arya & Shri Sanjeev Arya into the Congress party in the presence of Shri @kcvenugopalmp Shri @harishrawatcmuk Shri @devendrayadvinc Shri @UKGaneshGodiyal Shri @incpritamsingh & Smt. @DipikaPS pic.twitter.com/C84nOiS3TC
— Congress (@INCIndia) October 11, 2021
यशपाल आर्या हे सात वर्षापूर्वी उत्तराखंड काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यशपाल आर्या हे उत्तराखंडमधील प्रमुख दलित नेते असून सहा वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. काँग्रेस प्रवेशामुळे त्यांची घर वापसी झाली असल्याची चर्चा असून प्रदेश काँग्रेसमध्ये नवीन उत्साह संचारल्याचं चित्र आहे.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हरिश रावत यांनी सांगितलं की येत्या काही काळात राज्यातील अनेक भाजपचे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील.
महत्वाच्या बातम्या :
- Pune Collage Reopen : आजपासून पुण्यातील महाविद्यालयं, विद्यापीठं सुरु; प्रवेशासाठी लसीचे दोन डोस बंधनकारक
- Mumbai Drugs Case : समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांची पाळत? NCB च्या झोनल डायरेक्टरांनी दाखल केली तक्रार
- Indian Stock Market : भारतीय शेअर मार्केट आता ब्रिटनलाही मागे टाकणार, टॉप 5 देशांच्या यादीत स्थान मिळणार