Pune Collage Reopen : आजपासून पुण्यातील महाविद्यालयं, विद्यापीठं सुरु; प्रवेशासाठी लसीचे दोन डोस बंधनकारक
Pune Collage Reopen : पुण्यात आजपासून महाविद्यालयं आणि विद्यापीठं सुरु होत आहेत. तसेच एकीकडे कॉलेजेस सुरु होत असताना दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळंही आजपासून सुरु होणार आहे.
Pune Collage Reopen : पुणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयं आणि विद्यापीठं आजपासून खुली होत आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानं आजपासून पुण्यातील महाविद्यालयं आणि विद्यापीठं सुरु होणार आहेत. महाविद्यालयं आणि विद्यापीठात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जे विद्यार्थी पुण्याबाहेरुन येणार आहेत, त्यांना आरटीपीसीआर (RTPCR) अहवाल दाखवावा लागणार आहे. तर तिकडे पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळंही आजपासून सुरु होताहेत.
कोरोना प्रादुर्भावामुळे देशासह राज्यात लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. अशातच राज्यातील शाळा, कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावल्यामुळं राज्यातील शाळांपाठोपाठ महाविद्यालयं आणि विद्यापीठं पुन्हा सुरु करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आजपासून कॉलेज आणि विद्यापीठ आजपासून सुरु होणार आहेत. कॉलेजेस आणि विद्यापीठात प्रवेश करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणं गरजेचं असणार आहे. तसेच, जे विद्यार्थी पुणे जिल्ह्याच्या बाहेरून शिक्षणासाठी पुण्यातील महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये येणार आहेत, त्यांना आरटीपीसीआर (RT-PCR) अहवाल दाखवावा लागणार आहे.
पुणेकरांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
अजित पवारांनी दिलेल्या माहितीनुसार, आता सोमवारपासून खासगी कार्यालयात 100 टक्के उपस्थितीला परवानगी देत आहे, मात्र कोरोना नियमाचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. 22 ऑक्टोबरपर्यंत नाट्यगृह 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय घेऊ असंही यावेळी अजित पवारांनी सांगितलं होतं. सोबतच पुण्यातील हॉटेल आता 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, पुण्यात एकीकडे कॉलेजेस सुरु होत असताना दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळंही आजपासून सुरु होणार आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुढच्या काही दिवसांत टप्प्या टप्प्याने पुण्यातील नाट्यगृह, पर्यटन स्थळं आणि विद्यापीठं सुरु होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार, आजपासून पुण्यातील महाविद्यालयं आणि पर्यटन स्थळं सुरु होणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
बालकांच्या लसीकरणाबाबत केंद्राने लवकरात लवकर निर्देश द्यावेत: अजित पवार