अलिगडमध्ये पुण्यतिथीदिनीच महात्मा गांधींच्या प्रतिमेला गोळ्या
महात्मा गांधींच्या प्रतिमेची प्रतिकात्मक हत्या करण्याचं कृत्य या विकृतांनी केलं आहे. हिंदू महासभेच्या या विकृतीवरुन अवघ्या देशात संतापाची लाट पसरली आहे. अनेकांकडून पूजा पाण्डेयच्या कृतीचा निषेध केला जात आहे.
लखनौ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 71 व्या पुण्यतिथीच्या दिवशी हिंदुत्ववादी संघटनेची विकृती समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या अलिगडमध्ये भारत हिंदू महासभेची राष्ट्रीय सचिव पूजा शकून पाण्डेय हिने महात्मा गांधीचा अपमान केला.
महात्मा गांधींच्या प्रतिमेची प्रतिकात्मक हत्या करण्याचं कृत्य या विकृतांनी केलं आहे. हिंदू महासभेच्या या विकृतीवरुन अवघ्या देशात संतापाची लाट पसरली आहे. अनेकांकडून पूजा पाण्डेयच्या कृतीचा निषेध केला जात आहे.
ज्या दिवशी बापूजींच्या प्रतिमेला हार वहायचे, त्याच दिवशी हिंदू महासभेचे नेते त्यांना गोळ्या घालताना दिसत आहेत. आजच्याच दिवशी नथुराम गोडसेने बापूजींची हत्या केली होती. तोच प्रसंग उभा करण्यासाठी अलिगडमध्ये हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी बापूजींच्या प्रतिमेलाच गोळ्या घातल्या.
नथुरामने बापूजींना जितक्या गोळ्या घातल्या तितक्याच म्हणजे 3 गोळ्या पूजा पाण्डेयने घातल्या. या विकृतीचा व्हिडीओ समोर आला आहे. याशिवाय हत्या खरी वाटावी यासाठी विकृतांनी प्रतिमेखाली रक्तही ओतलं होतं. त्यानंतर महात्मा गांधींची प्रतिमाही या विकृतांनी पेटवून दिली. ज्या नथुरामनं महात्मा गांधींची हत्या केली त्याच्या जयजयकाराचे नारेही यावेळी देण्यात आले.
पूजा पाण्डेय हिनेच या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. याआधीही नथुरामच्या जन्मदिनी मिठाई वाटण्याचा कार्यक्रम केला होता.
या संपूर्ण कृतीचा व्हिडीओ व्हायरल झाला असला तरी अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही. मात्र महात्मा गांधींचा अपमान करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.
व्हिडीओ