Rampur Road Accident : डबल डेकर बस आणि ट्रकचा भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू, 22 जखमी
Rampur Road Accident : उत्तर प्रदेशमधील रामपूरमध्ये शनिवारी रात्री डबल डेकर बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय.
Rampur Road Accident : उत्तर प्रदेशमधील रामपूरमध्ये शनिवारी रात्री डबल डेकर बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 22 जण जखमी झाले आहेत. मृतामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामपूरमधील सिविल लाइन परिसरातील बायपासजवळ हा अपघात झाला. अपघातग्रस्त ट्रक मुरादाबादकडे जात होती तर बस शाहजहांपूरकडून येत होती. यावेळी हा भीषण अपघात झाला.
डबल डेकर बस आणि ट्रक यांची समोरासमोर धडक झाल्यामुळे भीषण अपघात झाला. पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एका व्याक्तीचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातामध्ये 22 जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी जवळील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामपूर येथे झालेल्या रस्ते अपघातातील मृत्युंबाबत तीव्र शोक व्यक्त केला. मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाप्रती त्यांनी दुःख व्यक्त केले. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन सर्वतोपरी मदत करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतामध्ये शाहजहांपूर येथील 35 वर्षीय शमीमूल हक, सहारनपुरचे 52 वर्षीय नसीम खान आणि 50 वर्षीय अब्दुल वाहिद यांचा समावेश आहे. त्याशिवाय शाहजहांपूरमधील 26 वर्षीय साक्षी यांचाही या अपघातामध्ये मृत्यू झाला. दोन जणांची अद्याप ओळख पटलेली नाही. सर्व मृतदेहांना पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातानंतर ट्विट करत दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, उत्तर प्रदेशातील रामपूर येथे झालेला रस्ते अपघात ही अतिशय दुःखद घटना आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करून, जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी मी प्रार्थना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन घटनास्थळी सर्वतोपरी मदत करत आहे.
उत्तर प्रदेश के रामपुर में हुआ सड़क हादसा अत्यंत दुखद है। इस दुर्घटना में जान गंवाने वालों के परिजनों के प्रति गहरी संवेदना प्रकट करने के साथ ही घायलों के शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूं। राज्य सरकार की देखरेख में स्थानीय प्रशासन मौके पर हरसंभव मदद में जुटा है: PM Modi
— PMO India (@PMOIndia) July 17, 2022