एक्स्प्लोर
सभेपूर्वीच अखिलेश आणि राहुल गांधींच्या प्रचार सभेचं व्यासपीठ कोसळलं

अलाहाबाद: उत्तर प्रदेश निवडणुकीतल्या चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या. चौथ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी स्वत: ला प्रचाराच्या मैदानात झोकून दिलं होतं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अलाहाबादमध्ये रोड शो केला. तर दुसरीकडं भाजप अध्यक्ष अमित शाह यांनीही अलाहाबादमध्ये रोड शो करुन शक्तीप्रदर्शन केलं. पण अखिलेश आणि राहुल गांधीच्या रोड शोनंतर आयोजित केलेल्या प्रचार सभेचं व्यासपीठ सभेपूर्वीच कोसळल्यानं मोठी दुर्घटना टळली. रोड शोनंतर मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि राहुल गांधी ज्या व्यासपीठावरुन जनतेला संबोधित करणार होते. ते व्यासपीठ अचानक कोसळलं. या घटनेत कोणीही जखमी झाले नसले, तरी एक मोठी घटना टळली. संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रोड शो संपणार होता. पण गर्दीमुळे हा रोड शो वेळेत पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांना हा रोड शो अर्ध्यावरच समाप्त करावा लागला. या रोड शोनंतरच अखिलेश यादव आणि राहुल गांधी जनतेला संबोधित करणार होते. पण 5 वाजल्याने ती सभाही होऊ शकली नाहीच, उलट सभेसाठी उभारण्यात आलेलं व्यासपीठ अचानक कोसळलं. पण सुदैवाने त्यावेळी कोणीही दिग्गज नेते तिथं उपस्थीत नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
आणखी वाचा























