एक्स्प्लोर
Advertisement
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाचा सस्पेंस संपणार?
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाबाबत सात दिवसांपासून सुरु असलेला सस्पेंस आज (18 मार्च) संपण्याची शक्यता आहे. आज उत्तर प्रदेशला नवा मुख्यमंत्री मिळण्याची शक्यता असून यामध्ये रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सात दिवस उलटले आहेत. मात्र अजूनही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवण्यात आलेला नाही. त्यामुळे आज (18 मार्च) सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला जाणं अपेक्षित आहे.
भाजपच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य, मनोज सिन्हा आणि योगी आदित्यनाथ यांची नावं स्पर्धेत आहेत.
मनोज सिन्हा प्रबळ दावेदार?
मनोज सिन्हा मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मनोज सिन्हा आज त्यांच्या गावी जाऊन कुलदेवतेचं दर्शन घेणार आहेत. त्यांच्या कुटुंबियांच्या मते नवीन काम सुरु करण्याआधी कुलदेवतेचं दर्शन घेतलं जातं. कुटुंबियांच्या अपेक्षा वाढल्या असल्या तरी सिन्हा यांनी मात्र अद्याप सूचक मौन बाळगलं आहे.
राजनाथ सिंहांची राज्यात बदली?
सध्या केंद्रीय गृहमंत्री असलेले राजनाथ सिंह यांना उत्तर प्रदेशमध्ये पाठवलं जाण्याची शक्यता आहे. मात्र राजनाथ सिंह यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.
योगी आदित्यनाथ किंवा केशव प्रसाद मौर्यांना संधी?
पूर्व उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा सर्वात मोठा चेहरा असलेले योगी आदित्यनाथही मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असल्याचं बोललं जातं. मात्र योगी आदित्यनाथ यांनीही याबाबत बोलणं टाळलं आहे.
उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या विजयात महत्वाची भूमिका निभावणारे केशव प्रसाद मौर्य यांच नावही चर्चेत आहे. मात्र पक्षाने त्यांना सध्या मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निवडण्याची जबाबदारी दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement