महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची राष्ट्रपतींकडे मागणी
अँटिलिया बाहेरील स्फोटकांचं प्रकरण, सचिन वाझेंचं प्रकरण, गृहमंत्र्यांवर झालेले 100 कोटी वसुलीचे आरोप, राज्यातील कोरोनाचं वाढतं प्रमाण या सर्वांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी राष्ट्रपतींकडे केली आहे. रामदास आठवले यांनी आज सकाळी 10.30 वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. राज्यात सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
एबीपी न्यूजशी बोलताना रामदास आठवले यांनी सांगितलं की, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटून मी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. अँटिलिया बाहेरील स्फोटकांचं प्रकरण, सचिन वाझेंचं प्रकरण, गृहमंत्र्यांवर झालेले 100 कोटी वसुलीचे आरोप, राज्यातील कोरोनाचं वाढतं प्रमाण या सर्वांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी राष्ट्रपतींकडे मागणी केली आहे. याबाबत विचार केला जाईल असं राष्ट्रपतींनी सांगितलं आहे.
संबंधित बातम्या