Weather Update: पुण्यासह राज्याच्या 'या' भागात हवापालट, थंडीचा जोर ओसरला, कसं राहणार तापमान, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Weather Update: राज्याच्या काही भागात पुन्हा एकदा थंडीचा जोर कमी होऊ लागला आहे. तर किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीची लाट ओसरली आहे.
पुणे: राज्याच्या काही भागात वाढलेला गारठा पुन्हा तमी होऊ लागला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील थंडीची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली आहे. पुण्यात (Pune Weather Update) देखील गारठा देखील कमी झाला आहे. राज्याच्या काही भागात थंडी ओसरली आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीची लाट ओसरली आहे. राज्यात गारठा कमी-अधिक होत असतानाच अनेक भागांत धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळत आहे. काल धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी 8.8 अंश तापमान नोंदले गेले आहे. आज राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहून गारठा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात असलेले कमी दाब क्षेत्र तीव्र झाले आहे. (Pune Weather Update)
उत्तर आणि ईशान्येकडे सरकताना आज (ता. 22) या प्रणालीची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका पुन्हा वाढू लागला आहे. काल पंजाबच्या 'आदमपूर' येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी 1.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुणे, सातारा, कोल्हापुरसह पश्चिम महाराष्ट्रातील (Maharashtra Weather Update) किमान तापमानात वाढ झाली असून थंडीचा जोर ओसरला आहे. आज 16 अंश किमान तर 31 अंश सेल्सिअस कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update)
उत्तर भारतातून शीत लहरी आणि बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे येत आहेत, त्यामुळे हवेच्या वरच्या थरांत वाऱ्यांचा वेग वाढल्याने असे वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरात दोन दिवसांपूर्वी कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात ढ़गाळ वातावरण तयार झाले. त्यामुळे किमान तापमानात 3 ते 5 अंशांनी वाढ झाली आहे. तापमान वाढताच वातावरणातील गारवा कमी होईल, असे वाटले होते. मात्र, हवेच्या वरच्या थरात वाऱ्यांचा वेग वाढला आहे. उत्तरेतील शीत लहरी आणि बंगालच्या उपसागराकडून येणारे वाष्पयुक्त वारे यामुळे तापमान वाढूनही बोचऱ्या वाऱ्यांमुळे थंडीचा कडाका कमी झालेला नाही. प्रामुख्याने रात्री 10 ते पहाटेपर्यंत दाट धुके आणि थंडी जाणवत आहे. (Maharashtra Weather Update)
जळगाव 12, पुणे 16.4, मुंबई 20.1, अहिल्यानगर13.7, कोल्हापूर 18.6, महाबळेश्वर 13.8 मालेगाव 12.4, नाशिक 12.4, सांगली 17.2, सातारा 14.5, सोलापूर 18.8, धाराशिव 14.4, छत्रपती संभाजीनगर 14.4, परभणी 16.1, बीड 14.1, अकोला 14, अमरावती 26.1, बुलडाणा 15.2, ब्रह्मपुरी 18.3.