एक्स्प्लोर

Phone Tapping | रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग करताना गृहसचिवांची परवानगी घेतलीच नव्हती- जितेंद्र आव्हाड

फोन टॅपिंग प्रकरणावरुन राज्यात दर दिवशी खळबळजनक माहिती समोर येण्याचं सत्र सुरु असतानाच कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले.

Phone Tapping :  परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर अखेरीस महाविकास आघडी आक्रमक झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपाला उत्तर द्यायला सगळे मंत्री एकत्र आल्याचे चित्र आहे. फोन टॅपिंग प्रकरणावरुन राज्यात दर दिवशी खळबळजनक माहिती समोर येण्याचं सत्र सुरु असतानाच कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले. रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग करताना गृहसचिवांची परवानगी घेतलीच नव्हती असा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला. यामध्ये अनेक मंत्र्यांचेही फोन टॅप करण्यात आले असा दावाही त्यांनी केला.  

रश्मी शुक्ला यांच्याबाबत खळबळजनक दावा करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'कोणालाही फोन टॅप करायचा असेल तर त्यासाठी अतिरिक्त मुख्य गृह सचिवांची रितसर परवानगी लागते, रश्मी शुक्लांनी अमुक एका क्रमांकासाठी परवानगी घेतली होती का, या प्रश्नाचं उत्तर कुंटे यांनी नकारात्मक स्वरुपात दिलं. पोलीस बदली रॅकेट प्रकरणी सत्ताधाऱ्यांनी परवानगी शिवाय फोन टॅपिंग केलेच कसा असा सवाल केला आहे. या प्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून रश्मी शुक्ला यांच्यावर टीका केली आहे. 'रश्मी शुक्ला या पोलीस अधिकारी आहेत म्हणून कोणत्याही  नागरिकांचा फोन टॅप कसा करू शकतात', असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. फोन टॅपिंग करता  नियम व कायदे आहेत, या प्रकरणात असे दिसते की अधिकार्‍यांना वाटलं की ते काहीही करु शकतात आणि याची कोण खात्री देईल की अजून किती जणांचे फोन टॅपिंगला लावले होते? असा गंभीर आरोपच मंत्री आव्हाड यांनी केलं आहे.

रश्मी शुक्ला यांच्या अहवालाने त्याच फक्त एक सरळ आणि स्वच्छ अधिकारी आहेत आणि बाकीचे सर्वच भ्रष्ट आहेत हा पोलीस खात्याचा अपमान आहे.. शुक्ला यांनी नाव घेतलेल्या न सर्व अधिकाऱ्यांनी सरकारचा सल्ला घेऊन त्यांच्याविरोधात कोर्टात जावे अशीही भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली आहे. 

मोठे फेरबदल; मुंबई क्राइम ब्रांचमधील 65 अधिकाऱ्यांच्या बदल्या

फोन टॅपिंग करण्याच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा कट होता, असं म्हणत त्याच पत्राच्या माध्यमातून सरकारला बदनाम केलं जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी शुक्ला यांच्यावर केला. 

फडणवीसांनी केवळ पोलिसांचीच नाही तर एसआरएतील विकासकांना देखील नोटिस दिलेली, भाई जगतापांचा नवा आरोप

राज्य सरकारकडून फोन टॅपिंगसाठी परवानगी देण्याची कारणे आहेत. फोन टॅपिंग नेमकं कोणत्या कारणासाठी आणि व्यक्तीसाठी केली जाते आणि नेमके काय घडले हे समस्त महाराष्ट्रासमोर जाहिररित्या आलं पाहिजे याबाबत माहिती दिली पाहिजे अशी मागणीच जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

राज्य सरकारला मूर्ख बनवत रश्मी शुक्ला यांनी 'अ' व्यक्तीच्या फोन टॅपिंगची परवानगी घेऊन 'ब' व्यक्तीचा फोन टॅप केला हे अत्यंत भयंकर आहे आणि या रिपोर्टच्या माध्यमातून महाविकासआघाडीची बदनामी करण्याचं हे एक नियोजनबद्ध केलेलं कारस्थान आहे असा ही गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यामुळे एकूणच महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबत बैठक बोलावली आहे. महाविकास आघाडी याबाबत कडक पाऊल उचलणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lehenga Controversy Wedding : कसला लेहेंगा दिलाय? वास मारतोय, 20 रुपयाची नाडी लावलीय, दागिनेही बोगस! वाद वाढला, वधूसह आई भडकली, लग्नाची वरात रिकाम्या हाताने परतली!
कसला लेहेंगा दिलाय? वास मारतोय, 20 रुपयाची नाडी लावलीय, दागिनेही बोगस! वाद वाढला, वधूसह आई भडकली, लग्नाची वरात रिकाम्या हाताने परतली!
KCC : किसान क्रेडिट कार्डच्या कर्जवाटपासंदर्भात मोठी अपडेट, आतापर्यंत 7.72 कोटी शेतकऱ्यांनी घेतला KCC च्या सेवेचा लाभ
किसान क्रेडिट कार्डच्या कर्जवाटपासंदर्भात मोठी अपडेट, आतापर्यंत 7.72 कोटी शेतकऱ्यांनी घेतला लाभ
Afghanistan In Champions Trophy : पाकिस्ताननं पहिल्या गाडीनं घर गाठलं, पण अफगाणिस्तानच्या मदतीला अवकाळी पाऊस आला धावून! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनला पोहोचण्याची सुवर्णसंधी
पाकिस्ताननं पहिल्या गाडीनं घर गाठलं, पण अफगाणिस्तानच्या मदतीला अवकाळी पाऊस आला धावून! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनला पोहोचण्याची सुवर्णसंधी
Video : आली लग्न घटी समीप नवरा, सात फेरे सुरुच होणार तेवढ्यातच कोहलीच्या शतकाने भारत-पाकिस्तान सामन्यात आले रोमांचक वळण अन् पुढे काय घडलं?
Video : आली लग्न घटी समीप नवरा, सात फेरे सुरुच होणार तेवढ्यातच कोहलीच्या शतकाने भारत-पाकिस्तान सामन्यात आले रोमांचक वळण अन् पुढे काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case Ujjwal Nikam :  संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणाचा खटला उज्ज्वल निकम लढवणारMahashivrastri Superfast News : नमो नमो शंकार... महाशिवरात्रीच्या सर्व बातम्या एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Headlines : 08 AM : 26 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Babulnath Mandir Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीनिमित्त बाबुलनाथ मंदिरात भाविकांची गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lehenga Controversy Wedding : कसला लेहेंगा दिलाय? वास मारतोय, 20 रुपयाची नाडी लावलीय, दागिनेही बोगस! वाद वाढला, वधूसह आई भडकली, लग्नाची वरात रिकाम्या हाताने परतली!
कसला लेहेंगा दिलाय? वास मारतोय, 20 रुपयाची नाडी लावलीय, दागिनेही बोगस! वाद वाढला, वधूसह आई भडकली, लग्नाची वरात रिकाम्या हाताने परतली!
KCC : किसान क्रेडिट कार्डच्या कर्जवाटपासंदर्भात मोठी अपडेट, आतापर्यंत 7.72 कोटी शेतकऱ्यांनी घेतला KCC च्या सेवेचा लाभ
किसान क्रेडिट कार्डच्या कर्जवाटपासंदर्भात मोठी अपडेट, आतापर्यंत 7.72 कोटी शेतकऱ्यांनी घेतला लाभ
Afghanistan In Champions Trophy : पाकिस्ताननं पहिल्या गाडीनं घर गाठलं, पण अफगाणिस्तानच्या मदतीला अवकाळी पाऊस आला धावून! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनला पोहोचण्याची सुवर्णसंधी
पाकिस्ताननं पहिल्या गाडीनं घर गाठलं, पण अफगाणिस्तानच्या मदतीला अवकाळी पाऊस आला धावून! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनला पोहोचण्याची सुवर्णसंधी
Video : आली लग्न घटी समीप नवरा, सात फेरे सुरुच होणार तेवढ्यातच कोहलीच्या शतकाने भारत-पाकिस्तान सामन्यात आले रोमांचक वळण अन् पुढे काय घडलं?
Video : आली लग्न घटी समीप नवरा, सात फेरे सुरुच होणार तेवढ्यातच कोहलीच्या शतकाने भारत-पाकिस्तान सामन्यात आले रोमांचक वळण अन् पुढे काय घडलं?
Bank employee Shot Dead : बँक डेटा मॅनेजरच्या लग्नानंतर अवघ्या एक वर्षभरात बायकोनं भावासह केलेल्या कृत्यानं हादरण्याची वेळ आली!
बँक डेटा मॅनेजरच्या लग्नानंतर अवघ्या एक वर्षभरात बायकोनं भावासह केलेल्या कृत्यानं हादरण्याची वेळ आली!
Bird Flu in Maharashtra: कोंबड्या सोडा आता कावळ्यांना बर्ड फ्लू झाला, धाराशिवच्या ढोकी गावात कावळ्यांचा पटापट मृत्यू
कोंबड्या सोडा आता कावळ्यांना बर्ड फ्लू झाला, धाराशिवच्या ढोकी गावात कावळ्यांचा पटापट मृत्यू
Eknath Shinde & Devendra Fadnavis: फडणवीसांच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदेंची आर्थिक कोंडी, तक्रार करायला पहाटे अमित शाहांना भेटले: सामना
'फडणवीसांच्या भीतीने एकनाथ शिंदेंचा 'कलेक्टर' 10 हजार कोटी घेऊन दुबईला पळालाय'; 'सामना'तील अग्रलेखातून खळबळजनक आरोप
Santosh Deshmukh Case: देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, संतोष देशमुख हत्याप्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
संतोष देशमुखांचा खटला उज्ज्वल निकम लढवणार, आरोपींना फासावर चढवणार?
Embed widget