एक्स्प्लोर
'नीट'मधून सुटका, राज्यात यंदा CET प्रमाणेच प्रवेश!
!['नीट'मधून सुटका, राज्यात यंदा CET प्रमाणेच प्रवेश! Union Cabinet Gives Its Nod To Ordinance To Keep State Boards Out Of The Ambit Of Uniformed Medical Entrance Exams For One Year 'नीट'मधून सुटका, राज्यात यंदा CET प्रमाणेच प्रवेश!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/02064903/NEET-580x338-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : 'नीट' परीक्षेबाबतच्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाने तत्वत: मान्यता दिली आहे. या अध्यादेशामुळे मेडिकल प्रवेशासाठी इच्छुक लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. आता हा अध्यादेश मान्यतेसाठी राष्ट्रपतींकडे जाणार आहे.
या अध्यादेशानुसार, महाराष्ट्रासह इतर आठ राज्यातील विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी 'नीट' परीक्षेतून दिलासा मिळला आहे. त्यामुळे यंदा राज्यात सीईटीप्रमाणेच मेडिकल प्रवेश होणार आहे. मात्र खासगी महाविद्यालयांना दिलासा मिळालेला नाही. त्यांचे मेडिकल प्रवेश 'नीट'प्रमाणेच होतील.
काय आहे प्रकरण?
मेडिकल प्रवेशासाठी 'नीट' ही एकच परीक्षा देशभर घेतली जावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. मात्र या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांची अडचण झाली होती. राज्यातील सीईटी रद्द करुन नीट परीक्षा देण्याची वेळ विद्यार्थ्यांवर ओढावली होती.
सविस्तर वृत्त : ‘नीट’ परीक्षेचा नेमका घोळ काय आहे?
याबाबत पुनर्विचार याचिका दाखल करुनही सर्वोच्च न्यायालय आपल्या निर्णयावर ठाम होतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे धाव घेतली. नीट आणि राज्यांतील सीईटी परीक्षेच्या अभ्यासक्रमात मोठा फरक आहे. त्यामुळे नीटनुसार परीक्षा घेण्यात आम्हाला दोन वर्षांची मुदत मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र सरकारने केली होती.तावडेंनी माझ्या मुलाची फसवणूक केली, पालक पोलिसात
'नीट' रद्द करण्याला केजरीवालांचा विरोध दरम्यान, 'नीट' परीक्षा रद्द न करण्याचं आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला केलं आहे. केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून ही परीक्षा रद्द करु नये अशी विनंती केली आहे. संबंधित बातम्या'नीट'प्रश्नी मुख्यमंत्री आज पंतप्रधानांची भेट घेणार
‘नीट’ प्रश्न सोडवण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
‘नीट’ प्रश्नी सुप्रीम कोर्टाचा विद्यार्थ्यांना दिलासा नाही
‘नीट’विरोधात सरकार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार
त्यापेक्षा अभ्यास करा, ‘नीट’बाबत विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली
‘नीट’ची परीक्षा 1 मे रोजीच होणार, सुप्रीम कोर्टाचे आदेश
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)