संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून : सूत्र
सदेचे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार असून 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नवी दिल्ली : संसदेचे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार असून 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा 29 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान तर दुसरा टप्पा 8 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे हे दोन्ही सभागृहांनी संबोधित करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Budget Session of Parliament to commence from January 29 and Union Budget will be presented on February 1: Sources
— ANI (@ANI) January 5, 2021
आगामी अर्थसंकल्प हा आधीच्या अर्थसंकल्पांपेक्षा वेगळा असणार आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या होत्या. अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, "सरकार कोरोनामुळे प्रभावित झालेल्या अर्थव्यवस्थेला चालना देणाचा प्रयत्न करणार आहे. आरोग्य, मेडिकल रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट आणि टेलिमेडिसिन या क्षेत्रांसाठी एक चांगलं वातावरण विकसित करणं महत्वाचं आहे. याचसोबत रोजगाराच्या आव्हानाला नव्या दष्टीकोनातून बघायला हवं, व्होकेशनल ट्रेनिंग आणि स्किल डेव्हलपमेंट या विषयांवर भर देणं गरजेचं आहे.'
भारत ग्लोबल ग्रोथ इंजिन बनेल अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, "पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प हा संसदेत 1 फेब्रुवारी 2021 रोजी मांडण्यात येणार आहे. कोरोनामुळे ज्या क्षेत्रात मंदी आली आहे त्या क्षेत्रांना चालना देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तसेच नव्या मागणीमुळे ज्या क्षेत्रात तेजी येत आहे अशा क्षेत्रांवरही लक्ष देण्यात येणार आहे. भारताकडे चांगला विकासदर प्राप्त करण्यासाठी जे काही आवश्यक असते ते सर्व म्हणजे, लोकसंख्या, बाजारपेठ आणि क्षमता ते सर्व काही आहे. भविष्यात भारत हा ग्लोबल ग्रोथ इंजिन असेल यात काही शंका नाही. जगाला मंदीतून बाहेर काढण्यासाठी भारत महत्वाची भूमिका बजावेल."
संबंधित बातम्या :