एक्स्प्लोर

Exclusive | परीक्षांबाबत फेरविचार नाही, यूजीसीच्या गाईडलाईन बंधनकारक : UGC उपाध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन

यूजीसीचे उपाध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत विद्यापीठाच्या परीक्षा, गाईडलाईन्स यासह अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.

नवी दिल्ली : परीक्षा घ्याव्यात हे यूजीसी आज सांगत नाही हे 29 एप्रिलपासून सांगत आहे. आतापर्यंत आमची अपेक्षा होती की वेगवेगळ्या विद्यापीठांनी त्याची तयारी सुरू केली असेल. आम्हाला या गाईडलाईन्स रिवाईस कराव्या लागल्या. कारण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जुलैमधे ते शक्य नव्हतं, असं यूजीसीचे उपाध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन यांनी म्हटलं आहे. विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षांवर यूजीसीची पहिली प्रतिक्रिया एबीपी माझाला मिळाली. यूजीसीचे उपाध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. डॉ.भूषण पटवर्धन म्हणाले की,  देशात काही विद्यापीठांनी परीक्षा घेतल्या देखील आहेत. शैक्षणिक लाइफ सायकलमध्ये परीक्षा हा महत्त्वाचा भाग आहे. त्याची पूर्तता केल्याशिवाय एखाद्याला पदवी देणे योग्य नाही. विद्यार्थ्यांना तात्पुरता लाभ दिसत असला तरी त्यांचा भविष्यातला विचार करणे आवश्यक आहे. कोरोनाची मार्कलिस्ट त्यांना आयुष्यभर बाळगावी लागेल. सर्वांना विचारात घेऊन हा निर्णय घेतला आहे, असं डॉ. पटवर्धन म्हणाले. त्यांनी सांगितलं की, 2003 मधली यूजीसीची रेगुलेशन आहे. त्याच्यात हे स्पष्ट म्हटलेले आहे की, या गाईडलाईन्स विद्यापीठावर बंधनकारक आहेत. त्यात shall हा शब्द वापरला आहे. तरीही विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकलं जातं हे दुर्दैवी आहे. एमबीबीएसचा विद्यार्थी जर परीक्षा दिली नसेल तर आपण त्याच्याकडे उपचाराला जाणार का? इंजिनियरने परीक्षा दिली नसेल तर त्याने बांधलेल्या पुलाबाबत खात्री बाळगणार का? असा सवाल त्यांनी यावेळी केला. तंत्रज्ञानाचा वापरासाठी पूर्ण मोकळीक राज्यांना अशा काय अडचणी आहेत हे हे कळू शकले नाही. तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो यूजीसीने त्यासाठी पूर्ण मोकळीक दिली आहे. ग्रामीण भागात सगळीकडे ऑनलाईनची सोय नाही हे बरोबर आहे. पण ऑनलाईनचा वापर आपल्याला शिक्षणात वाढवावा लागणार आहे त्याची तयारी करावी लागेल. ते आजच्या परिस्थितीत गरजेच राहणार आहे.एप्रिल महिन्यापासून आत्तापर्यंत तयारीला लागलो असतो तर आतापर्यंत स्थिती सुधारू ही शकलो असतो, असं ते म्हणाले. परीक्षेदरम्यान कोरोनाचा संसर्ग? काही विद्यार्थी परगावी गेले आहेत. त्यांचेही प्रश्न आहेत पण त्याबद्दल ही आपल्याला उपाय शोधता येतील, असंही पटवर्धन म्हणाले. परीक्षेदरम्यान कोरोनाचा संसर्ग झाला तर यूजीसी जबाबदार आहे का? असे प्रश्न विचारणे योग्य नाही. आपण दारूची दुकान चालू करतो त्यावेळी हे प्रश्न विचारले का? असं डॉ. पटवर्धन म्हणाले. यूजीसीने आपला स्टँड बदललेला नाही डॉ. पटवर्धन म्हणाले की, विद्यापीठांना जी स्वायत्तता दिली आहे. त्याचा वापर कुलगुरूंनी केला तर त्यातून नक्की मार्ग काढता येईल. सप्टेंबरमध्ये ते शक्यच नाही असं आत्ताच म्हणण्यापेक्षा त्यासाठी किमान तयारी करत राहणे योग्य राहील. यूजीसीने आपला स्टँड बदललेला नाही. पण जे लोक संभ्रम निर्माण करत आहेत, त्यांनी विचार करावा आपण हे का करतोय, असं ते म्हणाले. फेरविचार होऊ शकणार नाही आमच्याशी चर्चाच केली नाही हे आरोप चुकीचे आहेत. फेरविचार होऊ शकणार नाही. यूजीसीला हा संभ्रम आता संपवायचा आहे. केंद्रीय विद्यापीठं, राज्यातली अभिमत विद्यापीठं यांच्यासाठी तर यूजीसीच्या गाईडलाईन्स या बंधनकारकच आहेत. या प्रकरणात काही कोर्ट केसेसही झाल्या आहेत.  कोरोनासारख्या अभूतपूर्व संकटात नव्या शैक्षणिक पद्धतीसाठी आपण तयार राहिले पाहिजे, असं देखील पटवर्धन म्हणाले. VIDEO | पाहा पूर्ण मुलाखत

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Dhule:आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा;फडणवीसांची इच्छा पूर्ण करणारDevendra Fadnavis Dhule Speech : पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती, मोदींसमोर फडणवीसांची मोठी घोषणाJitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Amit Shah In Sangli : शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
Embed widget