एक्स्प्लोर
केरळ गोहत्या : युवक काँग्रेसच्या 16 सदस्यांविरोधात गुन्हा दाखल
नवी दिल्ली : केरळमधील कन्नूरमध्ये गोहत्या आणि तिरुअनंतपुरममधील बीफ पार्टीमुळे राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. याच प्रकरणावरुन आता केंद्रातील सत्ताधारी भाजपने काँग्रेसवर टीका करायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे याच प्रकरणात पोलिसांनी युवक काँग्रेसच्या 16 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, काँग्रेसने आपल्या दोन कार्यकर्त्यांना पक्षातून निलंबित केले आहे.
प्रकरण आधीच तापलेले असताना भाजपने एक फोटो जारी केला आहे, ज्यात गोहत्येतील आरोपी इसम काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत दिसत आहे.
याच प्रकरणावरुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.
केरळ पोलिसांनी गोहत्या करणाऱ्या युवक काँग्रेसच्या 16 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कन्नूरमध्ये सगळ्यांदेखत गोहत्या केली गेली.
काँग्रेस केरळही गोहत्या करणाऱ्या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात सक्त कारवाई करण्याच्या तयारीत आहे. याचअंतर्गत युवक काँग्रेसच्या दोन सदस्यांना निलंबित करण्यात आले आहेत.
SFI कडून अनेक ठिकाणी बीफ पार्टीचं आयोजन
जनावरांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात केंद्र सरकारने नवीन नियमावली जारी केल्यानंतर वादाला सुरुवात झाली. केंद्राच्या नियमावलीचा विरोध करण्यासाठी कन्नूरमध्ये गोहत्या, तर तिरुअनंतपुरममध्ये डाव्यांची विद्यार्थी संघटना असलेल्या एसएफआयने काही ठिकाणी बीफ पार्टीचं आयोजन केलं.
केरळची राजधानी तिरुअनंतपुरममध्ये बीफ पार्टीचं आयोजन करण्यात आले होते. डाव्यांची विद्यार्थी संघटना असलेल्या SFI ने तिरुअनंतपुरममधील विश्वविद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये बीफ पार्टी करण्यात आली.
केरळच्या मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केंद्राच्या नव्या नियमावलीविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं. त्यांनी पत्रात म्हटलं आहे की, “पशुविक्रीच्या नव्या नियमावलीवर माझा आक्षेप आह. ही जाचक नियमावली लवकरात लवकर हटवावी, जेणेकरुन लाखो शेतकरी संकटात सापडणार नाहीत. तसेच घटनेनं त्यांना बहाल केलेली मुलभूत हक्क देखील अबाधित राहतील.”
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
नाशिक
Advertisement