एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गुजरातमधून दोन आयसिस संशयितांना अटक
राजकोट/नवी दिल्ली : गुजरातमध्ये एटीएसकडून दोन आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधितांना अटक करण्यात आली आहे. दोघेही सख्खे भाऊ असल्याची माहिती आहे. गुजरातमधील एका धार्मिक स्थळावर यांचं हल्ल्या करण्याचं नियोजन होतं, शिवाय त्यांच्याकडून गन पावडर आणि स्फोटक साहित्यही जप्त करण्यात आलं आहे.
अटक करण्यात आलेले दोघेही कंप्यूटर एक्स्पर्ट आहेत. एकाने एमसीए, तर दुसऱ्याने बीसीएमध्ये शिक्षण पूर्ण केलं आहे. एनआयएने काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातून अब्दुल कासमी याला अटक केली होती. या दोघांचे संबंधही कासमीशी असल्याची माहिती आहे.
चोख बंदोबस्त असल्यामुळे धार्मिक स्थळावर हल्ला करण्याचं नियोजन अयशस्वी राहिलं. सुरेंद्र नगर येथील चोटिला येथे हल्ल्याचा कट होता, अशी माहिती आहे. दरम्यान गुजरातमधून आयसिस संबंधितांना अटक करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement