एक्स्प्लोर

.. आणि हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला 

Turmeric : हळदीच्या (Turmeric) पेटंटबाबतचा अमेरिकेशी (America) चालू असलेला कायदेशीर लढा भारताने 23 ऑगस्ट 1997 रोजी जिंकला होता. याबाबत सीएसआयआरने संशोधन केलं होतं. या घटनेला आज 25 वर्ष पूर्ण झाली आहेत.

Turmeric War : 23 ऑगस्ट 1997 रोजी हळदीच्या (Turmeric) पेटंटबाबतचा अमेरिकेशी (America) चालू असलेला कायदेशीर लढा भारताने ( India ) जिंकला. या घटनेला आज 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे.  1995 मध्ये अमेरिकेतील मिसिसिपी विद्यापीठामधील दोन संशोधकांना हळदीच्या जखम बरी करण्याच्या गुणधर्मावर अमेरिकेत पेटंट मिळालं. त्यानंतर हळदीसाठी भारत आणि अमेरिका एकमेकांसमोर उभे राहिले. भारताने निकराने आपली बाजू मांडली आणि अखेर हा लढा जिंकत हळद ही भारताचीच असल्याचे संपूर्ण जगाला दाखवून दिले. भारतीय शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर (Raghunath Mashelkar) यांनी या लढ्यात खूप महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. 

भारताकडून हा खटला भारतीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने लढला. त्यावेळी भारताने दावा केला होता की, हळदीचे अँटिसेप्टिक गुणधर्म भारताच्या पारंपारिक ज्ञानात येतात आणि त्यांचा उल्लेख भारताच्या आयुर्वेदिक ग्रंथातही आहे. यानंतर पीटीओने (PTO)  23 ऑगस्ट 1997 मध्ये दोन्ही संशोधकांचे पेटंट रद्द केले. 

...आणि असा जिंकला लढा
मिसिसिपी विद्यापीठामधील दोन संशोधकांना हळदीच्या जखम बरी करण्याच्या गुणधर्मावर अमेरिकेत पेटंट मिळालं. इकडे भातात डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी वृत्तपत्रात याबाबतचं वृत्त वाचलं आणि त्यांना धक्काच बसला. माशेलकर त्यावेळी दिल्लीमध्ये सीएसआयआरचे (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) संचालक म्हणून रुजू झाले होते. त्यांनी हळदीच्या या पेटंटच्या विरोधात लढा द्यायचं ठरवलं.  आणि सीएसआयआरमधले शास्त्रज्ञ कामाला लागले. त्यासाठी हळदीचा हा गुणधर्म भारतातील लोकांना हे पेटंट फाईल होण्याआधीपासून माहित होता हे सिद्ध करणं गरजेचं होतं. सीएसआयआरने त्यासाठी तब्बल 32 संदर्भ शोधून काढले. हे सर्व संदर्भ संस्कृत, उर्दू आणि हिंदीमधील होते. यातील काही संदर्भ तर शंभर वर्षांपेक्षा जुने होते. त्यामुळे  हे पेटंट अमेरिकन पेटंट ऑफिसने नाकारलं. एखाद्या विकसनशील देशाच्या पारंपरिक ज्ञानाला मान्यता देण्याच्या बाबतीत हळदीवरील पेटंटची केस हा एक मैलाचा दगड ठरला. 

असे सांगितले जाते की, हा खटला लढण्यासाठी सीएसआयआरने त्यावेळी अमेरिकन वकिलाची नेमणूक केली होती. या केससाठी तब्बल 15 हजार डॉलर्स खर्च केले होते. सीएसआयआरने बरीच कागदपत्रे सादर केली होती जी अनेक सायन्स जर्नल आणि पुस्तकांमध्ये प्रकाशित झाली होती. याच कागपत्रांमुळे भारताची बाजू भक्कम झाली आणि हा लढा जिंकण्यास भारताला बळ मिळालं. 

भारताने हा लढा जिंकला असला तरी या लढ्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे हळदीचं पेटंट अमेरिकेत फाईल करणारे संशोधक हरिहर कोहली आणि सुमन दास हे दोघेही भारतीय होते. अमेरिकन पेटंट कार्यालयात ते तपासणारा कुमार हा पेटंट परीक्षकही भारतीयच होता. आणि या अमेरिकी भारतीयांच्या विरोधात लढली भारतातली सीएसआयआर ही संस्था. 

पीटीओचं कार्य काय? 
पेटंट आणि ट्रेडमार्क ऑफिस (PTO) अर्थात पीटओ ही एजन्सी युनायटेड स्टेट्समधील ट्रेडमार्क आणि पेटंटशी संबंधित सर्व कायदे प्रशासित करण्यासाठी जबाबदार आहे. अनेक पिढ्यांचे उद्योजक आणि लहान व्यवसायांचे मालक तसेच मोठ्या कॉर्पोरेशन आणि विद्यापीठांसाठी ही एक महत्त्वाची एजन्सी आहे.  

पेटंट जारी करून ही एजन्सी जगभरातील नवीन तंत्रज्ञानाचा शोध, गुंतवणूक आणि खुलासा करण्यासाठी प्रोत्साहन देऊन तांत्रिक प्रगतीला प्रोत्साहन देते. ट्रेडमार्कच्या नोंदणीद्वारे, ही एजन्सी व्यवसायांना त्यांच्या गुंतवणुकीचे संरक्षण, वस्तूंचा प्रचार आणि प्रोत्साहनासाठी मदत करते.  

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: काँग्रेस आज देशभरात 'काळा दिवस' पाळणार, आंदोलनावेळी राहुल गांधी, प्रियंका गांधीवर झालेल्या कारवाईचा निषेध
Maharashtra Live News Updates: काँग्रेस आज देशभरात 'काळा दिवस' पाळणार, आंदोलनावेळी राहुल गांधी, प्रियंका गांधीवर झालेल्या कारवाईचा निषेध
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Jantar Mantar Protest Rules : जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget