(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Turkish Airlines: विमानात प्रवासादरम्यान बिघडली प्रवाशाची तब्येत, कोलकाता येथे तुर्की विमानाचे एमर्जन्सी लँडिग
Emergency Landing: वैमानिकाने परिस्थितीची माहिती कोलकाताच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) ला देऊन विमानाच्या आपत्कालीन लँडिंगसाठी परवानगी घेण्यात आली.
Emergency Landing Of Turkish Airlines: इस्तानबुल ते सिंगापूर उड्डाण घेतलेल्या स्पाईसजेटच्या विमानाचं कोलकाता येथे एमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing) करावं लागलं आहे. 69 वर्षीय एका प्रवाशाची तब्येत बिघडल्याने (69 Years Old Passenger) तुर्की एयरलाईन्सला (Turkish Airlines) कोलकाताच्या एनएससी बोस इंटरनॅशनल एअरपोर्टवर (Netaji Subhash Chandra Bose International Airport) एमर्जन्सी लँडिग करावी लागली
विमानातील प्रवाशाची तब्येत बिघडल्यामुळे परिस्थिती हाताळण्यासाठी पायलटला एमर्जन्सी लँडिंग करावी लागली. विमानातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार विमानातील एका वयोवृद्ध प्रवाशाच्या नाक आणि तोडांतून रक्त येऊ लागल्याने आपत्कालीन लँडिंगसाठी परवानी घेतली.
प्रवासी रुग्णालयात दाखल
वैमानिकाने परिस्थितीची माहिती कोलकाताच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) ला देऊन विमानाच्या आपत्कालीन लँडिंगसाठी परवानगी घेण्यात आली. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता एटीसीने वैमानिकाला खाली उतरण्यास सकाळी 11.45 परवानगी दिली. विमानतळवर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर दुपारी 2.30 वाजता विमानाने पुन्हा सिंगापूरच्या दिशेने प्रवास सुरू केला.
एमर्जन्सी फ्लाईट लँडिगच्या घटनेत वाढ
गेल्या काही दिवसात तांत्रिक बिघाडामुळे एमर्जन्सी फ्लाईट लँडिगच्या घटनेत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. दरम्यान या वेळी परिस्थिती थोडी वेगळी होती. विमानातील प्रवाशाची तब्येत बिघडल्याने एमर्जन्सी लँडिग करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोणत्याही देशात करता येते लँडिग?
एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) ची परवानगी घेत कोणत्याही देशात एमर्जन्सी लँडिग करता येते. कोणताही देश या साठी परवानगी नाकारत नाही. जर फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाड झाला असेल किंवा प्रवाशाची तब्येत बिघडली असेल तर नियमानुसार कोणत्याही देशात एमर्जन्सी लँडिग करता येते. विमानाचे सुरक्षित लँडिग करण्याची जवाबदारी ही एअर ट्रॅफिक कंट्रोलरची असते.
इतर महत्त्वाच्या बातम्या :