एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जयललितांचा शेवटचा व्हिडीओ, पोटनिवडणुकीआधी खेळी
दरम्यान, आपल्या फायद्यासाठी दिनाकरन यांनी आरके नगर पोटनिवडणुकीच्या एक दिवस आधी व्हिडीओ जारी केला आहे.
चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणात पुन्हा एकदा रंजक ट्विस्ट आला आहे. चेन्नईतील बहुचर्चित आरके नगर मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. परंतु त्याआधीच
टीटीवी दिनाकरन गटाने भावनिक चाल खेळली आहे. या गटाकडून तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे जयललिता यांचा शेवटच्या दिवसातला एक व्हिडीओ जारी केला आहे.
मृत्यूआधी जयललिता बरेच दिवस अपोलो रुग्णालायात उपचार घेत होत्या. हा व्हिडीओ तेव्हाचा आहे. व्हिडीओमध्ये जयललिता रुग्णालयातील त्यांच्या बेडवर बसलेल्या असून काहीतरी पीत असल्याचं दिसत आहे.
रुग्णालयात आपली मावशी शशिकला यांनी जयललितांचा काही मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता, असं दिनाकरन यांनी सांगितलं. दिनाकरन हे शशिकला यांचे भाचे आहेत.
दरम्यान, आपल्या फायद्यासाठी दिनाकरन यांनी आरके नगर पोटनिवडणुकीच्या एक दिवस आधी व्हिडीओ जारी केला आहे.
आरके नजर जयललितांचा मतदारसंघ
आरके नगर हा जयललिता यांचा मतदारसंघ होता. जयललिता यांच्या निधनामुळे इथे पोटनिवडणूक होणार आहेत. या निवडणुकीत 59 उमेदवार उभे आहेत. परंतु मुख्य लढत मधुसूदन, मरुथुगनेश आणि दिनाकरन यांच्यात आहे. या जागेसाठी 21 डिसेंबरला मतदान होणार असून 24 डिसेंबरला मतमोजणी आहे.
या जागेसाठी होणारी पोटनिवडणूक ही विद्यमान सरकारचं रिपोर्ट कार्ड मानलं जात आहे. जयललिता यांच्या निधनानंतर के पलानीस्वामी हे तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते.
अपोलो रुग्णालयात उपचार
जयललिता यांना मागील वर्षी 22 सप्टेंबर रोजी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जयललिता यांच्या सुमारे 75 दिवस उपचार सुरु होते. अखेर 5 डिसेंबरला त्यांचं निधन झालं. त्यांना चेन्नईच्या मरीना बीचवर एआयएडीएमकेचे संस्थापक आणि मेंटर एमजीआर यांच्या समाधीजवळ दफन करण्यात आलं होतं.
निवडणूक आयोगाचा इशारा
व्हिडीओ जारी झाल्यानंतर निवडणूक आयोगानेही पाऊल उचललं आहे. दिनाकरन गटाविरोधात कारवाई करण्याचा इशारा निवडणूक आयोगाने दिला आहे. हे आचारसंहितेचं उल्लंघन आहे, हा व्हिडीओ प्रसारित करायला नको होता, असं तामिळनाडूचे निवडणूक आयुक्त राजेश लखोनी यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement