एक्स्प्लोर

7 January In History : अभिनेता इरफान खानची जयंती,  बुद्धिबळपटू कृष्णन शशिकिरण याचा वाढदिवस; आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं...

आज म्हणजेच 7 जानेवारी रोजी ब्रिटीश सरकारने शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर दुसरा विरुद्ध खटला सुरू केला होता. अभिनेता इरफान खान याचा जन्म 7 जानेवारी 1967 रोजी झाला. 

On This Day In History : वर्षातील प्रत्येक दिवसाप्रमाणे 7 जानेवारीचा दिवसही इतिहासाच्या पानात अनेक चांगल्या-वाईट घटनांनी नोंदला गेला आहे. आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 6 जानेवारी रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. 7 जानेवारी रोजी ब्रिटीश सरकारने शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर दुसरा विरुद्ध खटला सुरू केला होता. 1857 मध्ये सरकारविरुद्ध बंडखोरी केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भारतीय बालकामगार विरोधी कार्यकर्त्या शांता सिन्हा यांचा जन्म आजच्या दिवशी म्हणजे 7 जानेवारी 1950 रोजी झाला. याबरोबरच अभिनेता इरफान खान याचा जन्म 7 जानेवारी 1967 रोजी झाला. याबरोबरच कृष्णन शशिकिरण याचा  जन्म 7 जानेवारी 1981 रोजी मद्रास येथे झाला. याशिवाय आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

1862 :  शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफरच्या विरोधात खटला सुरू झाला

7 जानेवारी रोजी ब्रिटीश सरकारने शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर दुसरा विरुद्ध खटला सुरू केला होता. 1857 मध्ये सरकारविरुद्ध बंडखोरी केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. भारताच्या या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी जफरला मोठी किंमत चुकवावी लागली. त्याला रंगूनला कैदी नेण्यात आले, जिथे तो 1862 मध्ये मरण पावला. देशाने त्यांच्या योगदानाचा गौरव केला आणि अनेक रस्त्यांना त्यांचे नाव देण्यात आले. पाकिस्तानातील लाहोर शहरातही त्यांच्या नावाने एक रस्ता आहे. बांगलादेशातील ढाका येथील व्हिक्टोरिया पार्कचे नामकरण बहादूर शाह जफर पार्क असे करण्यात आले आहे. स्वातंत्र्यसैनिकांना पाठिंबा दिल्याबद्दल ब्रिटीश सरकारने त्यांना रंगून (आता म्यानमार) येथे हद्दपार केले होते.  1857 चा उठाव मोडून इंग्रजांनी दिल्ली पुन्हा ताब्यात घेतली. या उठावाचा नामधारी प्रमुख होता दिल्लीश्वर सम्राट बहादूर शाह जफर. दिल्ली काबीज केली हे दाखवून देण्यासाठी बादशाहाला पकडणं इंग्रजांसाठी महत्त्वाचं होतं. यासाठी कॅप्टन विल्यम हॉडसनवर जबाबदारी सोपवण्यात आली. हॉडसनच्या नेतृत्वाखाली 100 सैनिक बादशाहाला पकडण्यासाठी रवाना झाले होते. बादशहाने हुमायूनच्या कबरीत आश्रय घेतला होता. हॉडसन जेव्हा हुमायूनच्या कबरीकडे निघाला तेव्हा वाटेत एकाही बंडखोराने त्याच्यावर किंवा त्याच्या सैन्यावर गोळीबार केला नव्हता.  

1950 : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भारतीय बालकामगार विरोधी कार्यकर्त्या शांता सिन्हा यांचा जन्म 

प्रो. शांता सिन्हा या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या बालकामगार विरोधी कार्यकर्त्या आहेत. त्या मम्मीदिपुडी वेंकटरंगिया फाऊंडेशनच्या संस्थापक आहेत, ज्याला MV फाउंडेशन म्हणून ओळखले जाते. याबरोबरच त्या हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी लागोपाठ दोन वेळा (प्रत्येकी 3 वर्षे) राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्षपद भूषवले आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (NCPCR) ची स्थापना मार्च 2007 मध्ये बाल संरक्षण कायदा, 2005, संसदेच्या कायद्याद्वारे (डिसेंबर 2005) करण्यात आली. ) अंतर्गत केली होती. प्रोफेसर सिन्हा  यांना 1998 मध्ये  भारत सरकारने पद्मश्री या नागरी सन्मानाने सन्मानित केले.
 
1967 :  अभिनेता इरफान खान याचा जन्म (Irrfan Khan)

अभिनेता इरफान खान याचा जन्म 7 जानेवारी 1967 रोजी झाला. त्यांना पद्मश्री आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासारखे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले होते. इरफान खान यांचे दिर्घ आजाराने 54 व्या वर्षी 29 एप्रिल 2020 रोजी निधन झाले.   राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या इरफान खानने आपल्या प्रतिभेच्या जोरावर जगासमोर नाव कमावले. सुमारे 30 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले, तसेच ब्रिटिश आणि अमेरिकन चित्रपटांमध्येही योगदान दिले. इरफानने 1995 मध्ये सुतपाशी लग्न केले, जी त्याच्यासोबत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये होती. इरफानला दोन मुले आहेत.

1979 : हिंदी चित्रपट अभिनेत्री बिपाशा बासूचा वाढदिवस (Bipasha Basu)

अभिनेत्री बिपाशा बसूचा जन्म 7 जानेवारी 1979 रोजी झाला. बिपाशा तमिळ, तेलुगू, बंगाली आणि इंग्रजी भाषेतील चित्रपटांमध्ये देखील दिसली आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेतलेल्या अभिनेत्रींपैकी एक बिपाशा बासूला  फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. विशेषतः थ्रिलर आणि हॉरर चित्रपट शैलीतील कामासाठी तिला ओळखले जाते.

1978 : एम. व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका महासागरात बेपत्ता झाली

एम. व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका 69 कर्मचाऱ्यांसह होनोलुलू जवळील महासागरात आजच्या दिवशी म्हणजेच 1978 रोजी बेपत्ता झाली होती.
 
1981 : भारताचा प्रसिद्ध बुद्धिबळपटू कृष्णन शशिकिरण यांचा जन्म  
 
कृष्णन शशिकिरण याचा  जन्म 7 जानेवारी 1981 रोजी मद्रास येथे झाला. तो भारतातील एक प्रसिद्ध बुद्धिबळपटू आहे. FIDE रेटिंगमध्ये भारताचे प्रसिद्ध विश्वनाथन आनंद आणि पी. हरिकृष्ण यांच्यानंतर तो तिसरा बुद्धिबळपटू आहे. तो 2000 मध्ये 'आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर' बनला.

2010 : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमधील ऐतिहासिक लाल चौकातील एका हॉटेलमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमधील ऐतिहासिक लाल चौकातील एका हॉटेलमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात 22 तास चकमक चालली. दोन दहशतवाद्यांच्या खात्माने ही चकमक संपली. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
Director Rob Reiner Wife Murder Case: सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
Embed widget