एक्स्प्लोर

Third Wave Coffee : कॉफी शॉपच्या वॉशरूममधील टाॅयलेट सीटसमोर डस्टबिनमध्ये सापडला छुपा कॅमेरा; तब्बल 2 तास रेकॉर्डिंग

फोन डस्टबिन बॅगमध्ये काळजीपूर्वक लपविला होता, ज्यामध्ये फक्त कॅमेरा दिसत होता. फोन फ्लाइट मोडवर होता, जेणेकरून कॉल किंवा मेसेज आल्यावर कोणत्याही प्रकारचा आवाज येणार नाही.

Third Wave Coffee : बंगळूरमधील (Bengaluru) कॉफी शॉपच्या वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा सापडल्याने खळबळ उडाली आहे. तो टॉयलेट शीटसमोरील डस्टबिनमध्ये लपवून ठेवला होता. दोन तास रेकॉर्डिंग चालू होते. एका महिलेने ते पकडले. ही घटना शनिवारी (10 ऑगस्ट) बंगळूरच्या बीईएल रोडवरील थर्ड वेव्ह कॉफी (Third Wave Coffee) आउटलेटमध्ये घडली. कॅफेमध्ये उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने या घटनेची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. त्याने सांगितले की फोन डस्टबिन बॅगमध्ये काळजीपूर्वक लपविला होता, ज्यामध्ये फक्त कॅमेरा दिसत होता. फोन फ्लाइट मोडवर होता, जेणेकरून कॉल किंवा मेसेज आल्यावर कोणत्याही प्रकारचा आवाज येणार नाही.

पोलिसांनी कॉफी शॉपच्या कर्मचाऱ्यांना अटक केली

वॉशरूममध्ये फोन आढळल्यानंतर महिलेने कॅफेच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. हा फोन तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. याप्रकरणी पीडित महिलेच्या मित्राने तक्रार केल्याचे सदाशिवनगर पोलिसांनी सांगितले. यानंतर कॉफी शॉपच्या कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. आरोपीचे वय सुमारे वीस वर्षे असून तो कर्नाटकातील भद्रावती येथील रहिवासी आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 77 (महिलेच्या संमतीशिवाय तिचे खाजगी फोटो पाहणे, कॅप्चर करणे आणि प्रसारित करणे) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्यान्वये त्याच्या विरोधात FIR नोंदवण्यात आली आहे.

कॉफी कंपनीने कर्मचारी काढून टाकला

या घटनेच्या वादानंतर थर्ड वेव्ह कॉफीने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. कंपनीने लिहिले की, बंगळूरमधील आमच्या बीईएल रोड आउटलेटमध्ये घडलेल्या घटनेने आम्ही दु:खी आहोत. थर्ड वेव्ह कॉफीमध्ये आम्ही अशा कृती अजिबात सहन करत नाही. आम्ही आरोपीला तात्काळ बडतर्फ केले आहे. थर्ड वेव्ह कॉफी ही एक प्रसिद्ध कॉफी शृंखला आहे, ज्याचे आउटलेट संपूर्ण भारतात आहेत. कंपनीच्या वेबसाइटनुसार, भारतातील 6 शहरांमध्ये तिचे 90 हून अधिक कॅफे आहेत. थर्ड वेव्ह कॉफीचे एकट्या बंगळूरमध्ये 10 आउटलेट आहेत.

ॲमेझॉन पार्सलमध्ये जिवंत कोब्रा सापडला

17 जून रोजी बेंगळुरूमध्ये ऑनलाइन पार्सलमधून जिवंत कोब्रा बाहेर आल्याची घटना समोर आली होती. तन्वी नावाच्या महिलेने ॲमेझॉनवरून गेमिंग कंट्रोलरची ऑर्डर दिली होती. 17 जून रोजी ती पॅकेज उघडत असताना आतून एक विषारी साप बाहेर आला. साप पॅकेजिंग टेपला अडकला होता, त्यामुळे कोणालाही इजा झाली नाही. महिलेने याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला होता. व्हिडिओमध्ये बाल्टीमध्ये ठेवलेले अर्धे उघडलेले ॲमेझॉन पॅकेज दाखवले आहे. पॅकेजिंग टेपमध्ये अडकलेला कोब्रा पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसत होता. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
नाशिकमध्ये शिंदे गटाने 7 मतदारसंघ हेरले, लोकसभेची चूक पुन्हा नाही, हेमंत गोडसेंचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
नाशिकमध्ये शिंदे गटाने 7 मतदारसंघ हेरले, लोकसभेची चूक पुन्हा नाही, हेमंत गोडसेंचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
One Nation One Election : केंद्र सरकार 3 विधेयक आणून नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच मोठा निर्णय घेणार? नेमका प्लॅन आहे तरी काय??
केंद्र सरकार 3 विधेयक आणून नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच मोठा निर्णय घेणार? नेमका प्लॅन आहे तरी काय??
Ramdas Athawale : महायुतीचं जागावाटपासाठी बैठकांचं सत्र, रामदास आठवलेंनी आरपीआयचा दोन अंकी आकडा सांगितला, भाजपकडे यादी सोपवली
महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटण्यापूर्वीच रामदास आठवलेंनी बावनकुळेंकडे यादी सोपवली, बच्चू कडूंना म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPhaltan : सोळशीच्या कार्यक्रमात अजित पवारांनी फोनवरून केली उमेगवारीची घोषणाGovernment Employees :सेवानिवृत्ती उपदान 14 लाखांवरून  20 लाख करणार?Narhari Zirwal : धनगर समाज आदिवासीत येत नाही; सरकारने जबाबदारी स्वीकारावी - नरहरी झिरवाळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
नाशिकमध्ये शिंदे गटाने 7 मतदारसंघ हेरले, लोकसभेची चूक पुन्हा नाही, हेमंत गोडसेंचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
नाशिकमध्ये शिंदे गटाने 7 मतदारसंघ हेरले, लोकसभेची चूक पुन्हा नाही, हेमंत गोडसेंचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
One Nation One Election : केंद्र सरकार 3 विधेयक आणून नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच मोठा निर्णय घेणार? नेमका प्लॅन आहे तरी काय??
केंद्र सरकार 3 विधेयक आणून नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच मोठा निर्णय घेणार? नेमका प्लॅन आहे तरी काय??
Ramdas Athawale : महायुतीचं जागावाटपासाठी बैठकांचं सत्र, रामदास आठवलेंनी आरपीआयचा दोन अंकी आकडा सांगितला, भाजपकडे यादी सोपवली
महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटण्यापूर्वीच रामदास आठवलेंनी बावनकुळेंकडे यादी सोपवली, बच्चू कडूंना म्हणाले...
Ajit Pawar : अजित पवारांची स्मार्ट खेळी,फोनवरुन दीपक चव्हाणांची उमेदवारी जाहीर, रामराजे खुदकन हसले, कारण...
अजित पवारांची स्मार्ट खेळी, भरसभेत फोनवरुन दीपक चव्हाणांना उमेदवारी, रामराजेंचा मूड बदलला
Sanjay Raut :शिंदे गटाचा दसरा मेळावा सुरत किंवा गुवाहाटीत व्हायला हवा, संजय राऊतांची बोचरी टीका
शिंदे गटाचा दसरा मेळावा सुरत किंवा गुवाहाटीत व्हायला हवा, संजय राऊतांची बोचरी टीका
Mammootty Net Worth: 'साऊथचे अंबानी' म्हणून ओळखले जातात 'मामूटी'; 100 कोटींच्या फक्त कार, इतर संपत्तीची बातच और... टोटल नेटवर्थ किती?
'साऊथचे अंबानी' सिनेस्टार 'मामूटी'; 100 कोटींच्या फक्त कार, इतर संपत्तीची बातच और... टोटल नेटवर्थ किती?
Ranjitsinh Mohite Patil: लोकसभेला अशक्य ते शक्य करुन दाखवलं, आता विधानसभेलाही शरद पवार माढ्याची हवा फिरवणार, रणजीतसिंह मोहिते पाटील भाजपला रामराम करण्याच्या तयारीत
लोकसभेला अशक्य ते शक्य करुन दाखवलं, आता विधानसभेलाही शरद पवार माढ्याची हवा फिरवणार
Embed widget