एक्स्प्लोर
Advertisement
चोराची बँकेतच गळफास लावून आत्महत्या
सतना : बँकेत चोरी करण्याच्या हेतूने घुसलेल्या चोराने पकडलं जाण्याच्या भीतीने बँकेतच गळफास लावून आत्महत्या केली. मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात रामपूर बघेलान ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
रामपूर बाघेलाल पोलिस ठाण्याचे एसएचओ अनिमेष द्विवेदी यांच्या माहितीनुसार, मध्यरात्री बेला गावात इलाहाबाद बँकेच्या शाखेत धर्मेंद्र पटेल (वय – 22 वर्षे) नावाची व्यक्ती शटर तोडून चोरीच्या उद्देशाने आत शिरला होता. चोराने बँकेची तिजोरी तोडण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात बँकेचं अलार्म वाजलं आणि बँक असलेल्या बिल्डिंगमधील लोक जागे झाले.
बँकेतील आवाज ऐकल्यानंतर लोकांनी आरडाओरड सुरु केली. काहीजण बँकेबाहेर काठ्या घेऊन उभे राहिले. त्यामुळे बँकेच्या आत असलेला चोर घाबरला.
द्विवेदी यांनी सांगितले, “मध्यरात्री 2 वाजून 40 मिनिटांनी या घटनेबाबत माहिती मिळाली आणि पोलिस 3 वाजून 15 मिनिटांनी पोहोचले. खिडकीतून पाहिल्यानंतर लक्षात आले की, बँकेच्या आत कुणीतरी लटकलं आहे.
“आम्हाला वाटलं बँकेत आणखी कुणी व्यक्ती असतील, म्हणून आम्ही सकाळपर्यंत वाट पाहिली. मात्र, सकाळी आत जाऊन पाहिलं, तर इतर कुणीच नव्हतं. मात्र, एकजणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.”, असेही द्विवेदी यांनी सांगितले,
सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून स्पष्ट झालं की, धर्मेंद्र पटेल ही व्यक्ती बँकेचं शटर तोडून चोरीच्या उद्देशाने आत शिरला होता. एका कपड्याने चेहरा झाकला होता. बँकेची तिजोरी तोडण्याचे प्रयत्न तो करत असल्याचेही सीटीव्हीत कैद झाले आहे.
धर्मेंद्र पटेल हा चोर बेला गावातील रहिवाशी असून, त्याच्याविरोधात तीन वर्षांआधीही चोरीच्या इतर तक्रारी दाखल आहेत. या सर्व प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
भविष्य
बॉलीवूड
Advertisement