(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सहा दिवसानंतर दिल्लीत कोरोना टेस्टिंग तिप्पट करणार : अमित शाह
गृहमंत्री म्हणाले की, दिल्लीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी येत्या दोन दिवसांत कोरोनाची चाचणी दुपटीने वाढविण्यात येणार आहे. तर 6 दिवसांनंतर ही चाचणी तीनपटीने केली जाणार आहे.
नवी दिल्ली : दिल्लीतील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदविस वाढत आहे. या पार्श्वभूनीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपराज्यपाल बैजल यांच्यात बैठक झाली. केंद्र सरकार दिल्लीत कोरोनावर नियत्रंण मिळवण्यासाठी 500 रेल्वे कोचचे 8000 बेड देणार तसेच दोन दिवसांत कोरोनाची चाचणी दोनपटीने वाढविण्यात येईल आणि 6 दिवसांनंतर ही चाचणी तीन पटीने केली जाणार आहे. असल्याची माहिती अमित शहा यांनी दिली. दिल्लीत वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. या बैठकीत केजरीवाल, अमित शहा यांच्यासह दिल्लीच्या तिन्ही महापालिकांचे अध्यक्ष केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन उपस्थित होते.
अमित शहा यांनी ट्विटरवर माहिती दिली. अमित शहा म्हणाले की, दिल्लीत कोरोनाबाधित रूग्णांना बेड लवकर मिळावे यासाठी केंद्रातील मोदी सरकारने तातडीने दिल्लीला 500 रेल्वेचे डबे देण्याचा निर्णय घेतला आहे. या कोचमध्ये 8000 बेड असून सर्व सोयी सुविधा असणार आहे. दिल्लीच्या कंटेनमेंट झोनमध्ये कॉन्टॅक्ट मॅपिंग चांगल्याप्रकारे करण्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य सर्वेक्षण केले जाणार आहे. ज्याचा अहवाल एका आठवड्यात येणार आहे. तसेच, रुग्णांचे मॉनिटरींग करण्यासाठी आरोग्य सेतु अॅप प्रत्येक व्यक्तीच्या मोबाइलमध्ये डाउनलोड केले जाणार आहे.
पुढच्या दोन दिवसात दुप्पट कोरोना चाचण्या होणार
गृहमंत्री म्हणाले की, दिल्लीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी येत्या दोन दिवसांत कोरोनाची चाचणी दोनपटीने वाढविण्यात येईल आणि 6 दिवसांनंतर ही चाचणी तीन पटीने केली जाणार आहे. तसेच काही दिवसांनंतर कंटेन्मेंट झोनमधील प्रत्येक मतदान केंद्रावर चाचणी सुरू केली जाणार आहे. दिल्लीतील छोट्या रुग्णालयांना कोरोनाबद्दल योग्य माहिती आणि मार्गदर्शक सूचना देण्यासाठी मोदी सरकारने एम्स रुग्णालयाच टेलीफोनिक मार्गदर्शनासाठी ज्येष्ठ डॉक्टरांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून सर्वांना याचा फायदा होणार आहे. या हेल्पलाईनचा नंबर उद्या जाहीर करण्यात येणार आहे.
टेस्टिंग रेटसाठी डॉ. वी. पाल यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन
शहा यांनी सांगितले की, कोरोनाबाधिक रुग्णांच्या उपचारासाठी दिल्ली येथील खाजगी रुग्णालयात 60 टक्के कोरोना बेड कमी दरात तसेच कोरोनाच्या चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी डॉ. पॉल यांच्या अध्यक्षतेखाली एका कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. शहरात एक समिती तयार करण्यात आली असून, उद्या हा अहवाल सादर करणार आहे. ते म्हणाले की, भारत कोरोनाशी भक्कमपणे लढा देत आहे आणि या संसर्गामुळे ज्या लोकांचा बळी गेला आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दलही ते संवेदनशील आहेत त्यांच्यासाठी सरकार दु:खी आहे. अंत्यसंस्कारासाठी सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे शेवटच्या अंत्य संस्कारासाठी वेळ लागणार नाही.
Coronavirus | देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग दुसऱ्यांदा 11 हजारापेक्षा अधिक वाढ