एक्स्प्लोर
श्रीनगरमध्ये पोलिसांवर गोळीबार करुन दोन दहशतवादी फरार
जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमधील श्रीहरी सिंह रुग्णालयातच दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याच गोळीबाराच्या आड दोन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमधील श्रीहरी सिंह रुग्णालयातच दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याच गोळीबाराच्या आड दोन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. यापैकी एक दहशतवादी पाकिस्तानचा असल्याचं समजतं आहे. ज्याचं नाव नावेद आहे.
या गोळीबारात एक पोलीस कर्मचारी शहीद झाला असून दोन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.
आज (मंगळवार) सकाळी श्रीनगरच्या सेंट्रल जेलमध्ये बंद असलेल्या सहा दहशतवाद्यांना नियमित तपासणीसाठी SMHS रुग्णालयात आणण्यात आलं होतं. याचवेळी यापैकी एका दहशतवाद्याने रुग्णालयात सोबत असलेल्या पोलिसाच्या हातून बंदूक खेचून घेत त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरु केला. अचानक उडालेल्या या गोंधळाचा फायदा घेऊन दोन दहशतवादी फरार झाले. यापैकी एक जण पाकिस्तानी दहशतवादी आहे. दरम्यान, अचानक झालेल्या या गोळीबारामुळे रुग्णालयात एकच धावपळ झाली. ज्याचा फायदा घेऊन दोन दहशतवादी पसार झाले. या दहशतवादी हल्यानंतर येथील संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून फरारी दहशतवाद्यांचा सध्या कसून शोध सुरु आहे. तसेच रुग्णालय परिसरातही मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. संबंधित बातम्या : जम्मू-काश्मीरच्या पुलवामात दहशतवाद्यांचा लष्करी तळावर ग्रेनेडनं हल्ला काश्मीरच्या सीमेजवळ पाकिस्तानचा मिसाईलनं हल्ला, कॅप्टनसह ४ जवान शहीदPhoto of prisoner Naveed who escaped after firing at police protection party at Shri Maharaja Hari Singh hospital in Srinagar #JammuAndKashmir pic.twitter.com/dOqjQnA0Ai
— ANI (@ANI) February 6, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement