श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद
श्रीनगरच्या बाटमालू चौकात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून आणखी एक जवान जखमी झाला आहे.

श्रीनगर : श्रीनगरच्या बाटमालू चौकात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून आणखी एक जवान जखमी झाला आहे. जखमी जवानाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संपूर्ण परिसराला भारतीय सैनिकांनी घेरलं असून दहशवाद्यांचा शोध सुरु आहे.
राजौरीच्या नियंत्रण रेषेवर संशयास्पद मृतदेह जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. पाकिस्तानातून घुसखोरी करणाऱ्या व्यक्तीचा हा मृतदेह असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नौशेराच्या सैर गावात 30 वर्षीय व्यक्तीचा हा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतव्यक्तीजवळ पाकिस्तानी चलन, एक डायरी आणि पाकिस्तानातील काही सिगरेट मिळाले आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेवर विजेच्या तारा पसरवण्यात आल्या आहेत. या तारांच्या संपर्कात आल्याचे या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा. कायदेशीर बाबी आणि वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर मृतदेह पुरण्यात आला आहे.
नौशेरा सेक्टर परिसरात पाकिस्तानकडून अनेकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेल आहे. याबाबत भारताने अनेक पाकिस्तानला इशारा दिला, मात्र तरी पाकिस्तानकडून भारतावर विविध माध्यामातून हल्ले सुरुच आहेत.























