एक्स्प्लोर
Advertisement
''मी पाकिस्तानचाच'', जम्मूत जिवंत पकडलेल्या दहशतवाद्याचा कबुलीनामा
नवी दिल्लीः जम्मूमध्ये बीएसएफच्या जवानांनी जिवंत पकडलेल्या आतंकवाद्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मी पाकिस्तानमधील असून मला लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदकडून प्रशिक्षण मिळालं होतं, असा कबुलीनामा या आतंकवाद्याने दिला आहे.
अब्दुल कयूम असं या 32 वर्षीय आतंकवाद्याचं नाव असून तो पाकिस्तानच्या सियालकोट येथे राहणारा आहे. पाकिस्तानमधील मानसेरा कॅम्पमध्ये 2004 पासून आपण दहशतवादाचं प्रशिक्षण घेत असल्याची कबुली या आतंकवाद्याने दिली आहे. मानसेरा कॅम्पमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या आतंवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं.
दरम्यान यामुळे पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा पुन्हा एकदा फाटला आहे. भारताच्या हाती जिवंत पुरावा लागल्याने पाकिस्तानने केलेले सर्व दावे खोटे ठरणार आहेत. कारण दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जाणारा कॅम्प हा पाकिस्तानमध्येच असून हाफिज सईद हा स्वतः मानसेरा कॅम्पला भेट देतो, असा कबुलीनामा अब्दुल कयूम या आतंकवाद्याने दिला आहे. आता पाकिस्तान यानंतर काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागलं आहे.
पाहा व्हिडिओः
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement