
Sammruddhi Mahamarg : उद्घाटनापूर्वीच समृद्धी महामार्गाची कमान कोसळून मोठी दुर्घटना, 1 ठार तर 2 जखमी
Sammruddhi Mahamarg : मुंबईसह नागपूरपर्यंतच्या शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या उद्धाटनाआधीच मोठी दुर्घटना घडली आहे.

Sammruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाची उन्नत वन्यजीव मार्गाची कमान कोसळून 1 कामगार ठार तर 2 कामगार जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी रात्री 3 वाजता नागपूरकडून 16 व्या उन्नत वन्यजीव मार्गाची कमान कोसळून अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
उद्घाटनापूर्वीच समृद्धी महामार्गाची कमान कोसळून अपघात,
समृद्धी महामार्गाला एकूण 105 कमानी आहेत , त्यापैकी मोठी असलेली 16 व्या क्रमांकाची कमान कोसळून अपघात झाला आहे. या अपघातामुळे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण MSRDC ला पुढे ढकलावं लागलं आहे. या अपघातातील मृत मजूर बिहारचा असल्याची माहिती समजत आहे, मुंबईसह नागपूरपर्यंतच्या शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या उद्धाटनाआधीच मोठी दुर्घटना घडली आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण लांबणीवर टाकण्यात आले आहे. या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे तर दोघे जखमी झाले आहेत.
उद्घाटनसोहळा पुढे ढकलला
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण 2 मे रोजी करण्याचे नियोजित होते. त्यासाठी महाविकास आघाडी सरकार ते तयारीही सुरू केली होती. नुकतेच नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सेलुबाजार ते वर्धा जिल्ह्यापर्यंत समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याची पाहणीही केली होती. मात्र आता अशी माहिती मिळत आहे की, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रक काढले आहे. हा सोहळा किमान दीड ते दोन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. या महामार्गावर वन्यजीवांसाठी ओव्हरपास बांधण्यात आले आहेत. त्यापैकी एक सोळाव्या नंबरचा ओव्हरपासचा आर्च कोसळला आहे. समृद्धी महामार्गावर अनेक ठिकाणी वन्यजीव उन्नत मार्ग म्हणजे वाईल्ड लाईफ ओव्हरपास बनवण्यात आले आहे. मात्र एका ठिकाणी आर्च पद्धतीचा ओव्हरपास अपघातामुळे क्षतिग्रस्त झाला आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम 30 एप्रिलपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र काही कारणास्तव ते 30 एप्रिलपर्यंत पूर्ण होऊ शकणार नाही. अशातच ही दुर्घटना घडल्यामुळे आता हा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.
समृद्धी महामार्गामुळे किती तासांत कुठे पोहचणार?
- मुंबई ते नागपूर हा प्रवास 8 तासांचा असेल
- मुंबई ते औरंगाबाद अवध्या 4 तासांचा असेल
- औरंगाबाद ते नागपूरही 4 तासांचा असेल
- नागपूर ते शिर्डीचा प्रवासही 5 तासांचा असेल
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
