एक्स्प्लोर

Telecom Ministry : आता तुम्हाला मोबाईलच्या IMEI नंबरची करावी लागणार नोंदणी, फोनचा गैरवापर टाळण्यासाठी दूरसंचार विभागाचा निर्णय

Telecom Ministry : टेलिकॉम विभागाकडून नव्या वर्षात अनेक नियम लागू होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मोबाईलचा IMEI नंबरची नोंदणी करावी लागणार आहे.

Telecom Ministry : लवकरच तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या आयएमईआय नंबरची (IMEI Number) नोंदणी करावी लागणार आहे. केंद्र सरकारकडून नवीन वर्षात अनेक मोठे बदल करण्यात येणार आहेत. टेलिकॉम (Telecom) विभागाकडून पुढच्या वर्षात अनेक नवे नियम लागू होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मोबाईलचा IMEI नंबरची नोंदणी करावी लागणार आहे. 1 जानेवारी 2023 पासून देशात विकल्या जाणार्‍या सर्व मोबाईल फोनसाठी इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी नंबर (IMEI Number) ची नोंदणी अनिवार्य असेल. सरकारने या संदर्भात 26 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, भारतात विकल्या जाणार्‍या सर्व मोबाईल हँडसेटचे IMEI क्रमांक त्यांच्या बनावट उपकरण प्रतिबंध पोर्टलवर नोंदणीकृत करावे लागतील. 

मोबाईलच्या IMEI नंबरची नोंदणी कुठे करायची?

दूरसंचार मंत्रालयाने या संदर्भात 26 सप्टेंबर रोजी एक अधिसूचना जारी केली आहे. यानुसार, 1 जानेवारीपासून भारतात आयात आणि उत्पादित केलेल्या सर्व मोबाईल फोनचा IMEI क्रमांक दूरसंचार विभागाच्या भारतीय बनावटी उपकरण प्रतिबंध पोर्टलवर नोंद करावा लागेल. यानंतर ग्राहकांना त्याचं प्रमाणपत्र मिळेल.

काय आहे नवा आदेश?

टेलिकॉम विभागाच्या नवीन आदेशानुसार, मोबाईल उत्पादकांना आणि आयतदारांना बनावट उपकरण प्रतिबंध पोर्टलवर भारतात उत्पादित सर्व मोबाईल फोनचे IMEI क्रमांक नोंदणीकृत करावे लागतील. ही अधिसूचना मोबाइल उपकरण ओळख क्रमांक (सुधारणा) नियम, 2022 सह छेडछाड प्रतिबंधक अंतर्गत जारी करण्यात आली आहे. प्रत्येक मोबाईल फोनला 15 अंकी IMEI क्रमांक असतो.

IMEI नंबर काय आहे?

मोबाईलची ओळखीसाठी प्रत्येक मोबाईल फोनला एक इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी नंबर (IMEI Number) असतो. IMEI नंबर 15 अंकी असतो. हा क्रमांक मोबाईलची ओळख म्हणून वापरला जातो. IMEI क्रमांकाचा वापर करुन तुम्ही मोबाईलच्या लोकेशनचा शोध घेऊ शकता. प्रत्येक मोबाईलचा IMEI नंबर वेगळा असतो. पण सध्या बाजारात अनेक बनावट मोबाईल फोन उपलब्ध आहेत. शिवाय अनेक वेळा मोबाईल फोनसोबत छेडछाड केल्याचे, हॅक केल्याचे किंवा मोबाईल चोरीच्या घटना समोर येतात. मात्र बनावट IMEI नंबरमुळे मोबाईल शोधणं अवघड होतं. त्यामुळे टेलिकॉम विभागानं हा नवा नियम लागू केला आहे.

'यासाठी' सरकारने उचललं मोठं पाऊल

केंद्र सरकारने मोबाईल संबधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी हा नवी नियम लागू केला आहे. IMEI क्रमांकाची नोंदणी केल्यामुळे केंद्र सरकारला हरवलेले किंवा चोरीला गेलेले फोन ब्लॉक करण्यास मदत होईल. सध्या अनेक घटनांमध्ये मोबाईल फोनचा गैरवापर होत असल्याचं आढळून आलं आहे. याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Visit Ajit Pawar Home : सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रीची भेटUddhav Thackeray Speech | खुर्चीवरून शिंदेंवर टीका, आरक्षणासाठी मनोज जरांगे, हाकेंना केलं आवाहनMCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षाManoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
Embed widget