एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आता इनकमिंग कॉल्स फ्री नाहीत?
आता फ्री इनकमिंग कॉल्ससाठी मोबाईलवर सर्वांनाच मिनिमम रिचार्ज करावा लागणार आहे.
मुंबई : आता मोबाईलवर फ्री इनकमिंग कॉल्स बंद होण्याची शक्यता आहे. फ्री इनकमिंग कॉल्ससाठी मोबाईलवर सर्वांनाच मिनिमम रिचार्ज करावा लागणार आहे. मिनिमम रिचार्जसाठी कंपन्यांनी तसे नवे प्लॅन सुरु केले आहेत. ग्राहकांना दर महिन्याला खास इनकमिंगसाठीचे प्लॅन्स देण्यात येणार आहेत. त्यानुसार रिचार्ज करावे लागतील. त्यामुळे आता केवळ इकमिंगसाठी सिमकार्ड वापरता येणार नाही.
काही ग्राहक केवळ इनकमिंगसाठीच सिम कार्ड्स वापरतात. हल्ली प्रत्येक मोबाईलमध्ये दोन सिम कार्ड्सची सुविधा उपलब्ध असल्याने अनेक ग्राहक केवळ एकाच सिम कार्डवर रिचार्ज करतात. त्यामुळे ग्राहक एका सिमकार्डवर केवळ इनकमिंग कॉल्स घेत असतील तर यापुढे अशी फ्री इनकमिग सेवा मिळणार नाही. फ्री इनकमिंग सेवेसाठी प्रत्येक ग्राहकाला रिचार्ज करावाच लागेल. रिचार्ज केला नाही तर इनकमिंग कॉल्सची मोफत सेवा बंद होईल.
रिलायन्स जिओच्या स्वस्त रिजार्च पॅकमुळे इतर कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. जिओला टक्कर देण्यासाठी आयडिया आणि वोडाफोन या दोन मोठ्या कंपन्या एकत्र आल्या. आता या कंपन्यांनी तोट्यातून बाहेर पडण्यासाठी हा नवा फंडा शोधला आहे.
जिओ कंपनी सुरु झाल्यापासून अनेक युजर्स इतर कंपन्यांच्या सिम कार्ड्सचा उपयोग केवळ इनकमिंग कॉल्ससाठी करतात. यादरम्यान रिचार्ज न केल्याने कंपन्यांना त्यांच्या ARPU म्हणजेच अॅव्हरेज रेव्हेन्यू पर युजर (प्रति ग्राहक सरासरी महसूल) मध्ये खूप नुकसान होत आहे. या नुकसानभरपाईसाठी आता मिनिमम रिचार्ज करावे लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
बॉलीवूड
Advertisement