एक्स्प्लोर
Advertisement
428 वर्ष जुन्या ऐतिहासिक चारमिनारचा काही भाग कोसळला
जमिनीपासून 160 फूट उंच आणि 428 वर्ष जुना चारमीनार ही ऐतिहासिक वास्तू आहे. भारतासह जगभरातून अनेक पर्यटक या प्रसिद्ध वास्तूला भेट देतात.
हैदराबाद : हैदराबाद शहराची ओळख असलेली ऐतिहासिक वास्तू चारमिनारचा काही भाग कोसळला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. राज्याच्या पुरातत्व विभागाने काही दिवसांपूर्वीच या इमारतीची डागडुजी केली होती. चारमीनारचा भाग का आणि कसा कोसळला याचा तपास पुरातत्व विभाग करणार आहे.
जमिनीपासून 160 फूट उंच आणि 428 वर्ष जुना चारमिनार ही ऐतिहासिक वास्तू आहे. भारतासह जगभरातून अनेक पर्यटक या प्रसिद्ध वास्तूला भेट देतात. कुतुब साम्राज्याचा पाचवा शासक सुलतान मुहम्मद कुली कुतब शाहने 1591 मध्ये चारमिनार बांधला होता. मुसी नदीच्या पूर्व किनाऱ्यावर चारमिनार बांधला आहे. चारमिनार म्हणजे चार खांब जे एकमेकांना जोडलेले आहेत.
याआधीही चारमिनारच्या पश्चिमेकडील काही भाग कोसळला होता. दररोज देश-विदेशांतील हजारो पर्यटक चारमीनारला भेट देतात. ही इमारत सध्या नाजूक परिस्थितीत असल्याने पर्यटकांना केवळ पहिल्या मजल्यापर्यंतच जाण्याची परवानगी आहे.Telangana: A portion of one of the pillars of the historic monument Charminar in Hyderabad, got damaged yesterday. No injuries reported. pic.twitter.com/ugzX8GDBdZ
— ANI (@ANI) May 2, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
क्राईम
भारत
राजकारण
Advertisement