![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
IAF Chopper Crash : कुन्नूर हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या जागी सापडला ब्लॅक बॉक्स, उलघडणार अपघाताचे रहस्य
सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूमुळं संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी संध्याकाळी सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची बैठक बोलावली होती.
![IAF Chopper Crash : कुन्नूर हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या जागी सापडला ब्लॅक बॉक्स, उलघडणार अपघाताचे रहस्य tamil nadu coonoor iaf mi 17 crash black box recovered from site IAF Chopper Crash : कुन्नूर हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या जागी सापडला ब्लॅक बॉक्स, उलघडणार अपघाताचे रहस्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/09/44f21cd2507e2ece9bbb2877ec266480_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bipin Rawat Death : बुधवारी सकाळी तामिळनाडूतील कन्नूरमध्ये हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या घटनेत देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टरमध्ये 14 जण होते. त्यापैकी केवळ एक ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे बचावले आहेत. ते गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, घटना घडलेल्या ठिकाणी ब्लॅक बॉक्स मिळाला आहे. या बॉक्समधून अपघात कशामुळे झाला याची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूमुळं संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी संध्याकाळी सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची बैठक बोलावली होती. यामध्ये गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि समितीचे इतर सदस्य उपस्थित होते. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. घडलेली घटना अतिशय दुर्देवी आहे. परंतु, देशातील एवढ्या मोठ्या पदावरील व्यक्तीचा असा अपघाती मृत्यू होणे ही धक्कादायक बाब आहे. त्यामुळे या घटनेवर विविध स्थरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु, आता ही घटना नक्की कशामुळे झाली याची माहिती मिळू शकते. कारण घटनास्थळावर ब्लॅक बॉक्स (helicopter balk box ) सापडला आहे.
याआधी हवाईदलाचे अध्यक्ष वी. आर. चौधरी यांनी तामिळनाडूचे डीजीपी सी. शैलेंद्र बाबूंसोबत कुन्नूरमध्ये घटनास्थळाची गुरूवारी सकाळी चौकशी केली. हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत यांच्या मृत्यूवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेच्या दोन्ही सभागृहात आज निवेदन देतील. बिपीन रावत यांना यावेळी वेलिंग्टनमध्ये श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. बिपीन रावत यांच्यासह सर्व 13 जणांचे पार्थिव आज दिल्लीत आणली जातील. बिपीन रावत यांच्यावर शुक्रवारी दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.
दरम्यान, देशातील सैन्याच्या सर्वात मोठ्या अधिकाऱ्याच्या निधनानंतर आता चर्चा सुरु झाली आहे की, देशाचे पुढचे सीडीएस कोण? सेवाज्येष्ठतेचा विचार करता जनरल एमएम नरवणे(Manoj Naravane) हे या पदासाठी प्रबळ दावेदार असल्याचं दिसत आहे. तिनही सेना प्रमुखांमधून सर्वात अनुभवी आणि ज्येष्ठ व्यक्तीची या पदासाठी निवड केली जाऊ शकते. अशातच नौदलाचे अधिकारी एडमिरल करमवीर सिंह सर्वात ज्युनिअर आहेत. त्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. लष्कर प्रमुख जनरल एमएम नरवणे आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी हे आहेत. जर या दोघांमध्ये अनुभव आणि सेवाज्येष्ठतेचा विचार केला तर, एमएम नरवणे हेच या पदासाठी प्रबळ दावेदार असल्याचं दिसत आहे. नरवणे हे 60 वर्षांचे आहेत. जनरल बिपिन रावत यांच्यानंतर त्यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नरवणे हे युद्धनितीतील सर्वात मोठे जाणकारही आहेत.
संबंधित बातम्या
Bipin Rawat Death : सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या निधनानं शोक; कोण असतील देशाचे पुढचे सीडीएस?
Bipin Rawat Helicopter Crash : 2015 मध्ये हेलिकॉप्टर क्रॅशमधून सुखरुप बचावले होते बिपिन रावत; काय होती ती दुर्घटना?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)