एक्स्प्लोर
VIDEO : ताज महालमध्ये पर्यटकांचे भगवे स्कार्फ काढले
नवी दिल्ली : जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेला आग्य्रातील ताजमहाल पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक भारतात येतात. ताजमहालमध्ये प्रवेश करताना भगवी वस्त्रं घातली, म्हणून ती उतरवण्यात आल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
परदेशी पर्यटक महिलेनं ही भगवी वस्त्रं घालून ताजमहालमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या एका तरुणानं हटकत भगवी वस्त्र काढून प्रवेश करण्यास सांगितलं. त्यानुसार महिलेनं भगवं वस्त्र काढून ताजमहालमध्ये प्रवेश केला.
हा व्हिडिओ खरा आहे की खोटा, याबाबत अनेक उलट-सुलट चर्चा सोशल मीडियात सुरु होत्या. यानंतर 'एबीपी माझा'नं या व्हिडिओची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार हा व्हिडिओ खरा असल्याची माहिती पुढे आली आहे.
एखाद्या पर्यटन स्थळावर विशिष्ट रंगाची वस्त्र घालण्यास मज्जाव का, याबाबत चौकशीचे आदेश दिले गेले आहेत. याशिवाय बजरंग दलानंही याविरोधात आंदोलन करुन या घटनेचा निषेध नोंदवला आहे.
ट्विटरवर एका यूझरने शेअर केलेला हा व्हिडिओ :
https://twitter.com/bhaiyyajispeaks/status/855012864976764928
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement