एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आफ्रिकन नागरिक मारहाण प्रकरण : परराष्ट्र मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर 5 जणांना अटक
नवी दिल्ली : आफ्रिकन नागरिकांना मारहाण आणि एका काँगो नागरिकाची हत्या आदींमुळे आफ्रिकन राजदूतांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आज आफ्रिकन नागरिकांचे संरक्षण आणि काँगो नागरिकाच्या हत्येप्रकरणातील दोषींवर कडक कारवाई व्हावी, यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि दिल्लीचे नायब नजिब जंग यांच्याशी चर्चा केली.
सरकारने मृत तरुणाचे शव काँगो लोकतंत्रिक गणराज्यला पाठवणार असल्याचे जाहीर केले आहे. सुषमा स्वराज म्हणाल्या की, " गृहमंत्री राजनाथ सिंह आणि उपराज्यपाल नजिब जंग यांनी या प्रकरणातील दोषींना कठोर शासन करण्याचे आश्वासन दिले आहे." स्वराज यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, दक्षिण दिल्लीमध्ये काल अफ्रिकन तरुणांना मारहाण प्रकरणी मी गृहमंत्री आणि उपराज्यपालांशी चर्चा केली असून त्यांनी दोषींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
तसेच या प्रकरणी ज्या अफ्रिकन तरुणांनी जंतरमंतरवर मंगळवारी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यांना राज्यमंत्री व्हि.के.सिंग आणि परराष्ट्र सचिव अमर सिन्हा यांना भेट घेण्याच्या सुचना केल्याचे सांगितले आहे.
या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप म्हणाले की, "सरकार या प्रकरणी अतिशय संवेदनशील असून या प्रकरणातील मृत तरुण मासुंदा कितांदा ओलिवर याचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांना सुपुर्द करून तो घेऊन जाण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल," असे स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणी दक्षिण दिल्लीमधून दोघांना अटक करण्यात आली असून इतर तीनजणांना ताब्यात घेण्यात आल्याचे दक्षिण दिल्लीचे पोलीस उपायुक्त ईश्वर सिंह यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्राईम
करमणूक
राजकारण
Advertisement