(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुलीला 'मंगळ' असल्याचं सांगत अत्याचार पीडितेशी लग्न करण्यास आरोपीचा नकार, प्रकरण अॅस्ट्रॉलॉजी विभागाकडे गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप
अत्याचार करणाऱ्या आरोपीने पीडितेशी लग्न करण्याचा आदेश दिला, पण मुलीला मंगळ असल्याचं सांगत आरोपीने नकार दिला, नंतर हे प्रकरण अॅस्ट्रॉलॉजी विभाकडे पाठवण्यात आलं.
अलाहाबाद : पीडितेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीसमोर न्यायालयाने तिच्याशी विवाह करण्याचा पर्याय ठेवला, पण त्या पीडितेला मंगळ असल्याने आरोपीने तिच्याशी लग्नाला नकार दिला, त्यानंतर त्या पीडितेला खरंच मंगळ आहे का याची चाचपणी करण्यासाठी न्यायालयाने हे प्रकरण विद्यापीठाच्या अॅस्ट्रॉलॉजी विभागाकडे पाठवलं..... ही घटना आहे उत्तर प्रदेशातील, आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची दखल आता सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून हे प्रकरण तातडीने सुनावणीस घेत अलाहाबाद न्यायालयाच्या निर्देशाला स्थगिती दिली आहे.
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील या आरोपीने एका युवतीला लग्न करण्याचं आमिष दाखवलं आणि वेळोवेळी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. नंतर त्याने त्या युवतीशी लग्नास नकार दिला. मग आपल्याला फसवल्याचं लक्षात आल्यानंतर या युवतीने त्या युवकावर बलात्काराचा आरोप करत गुन्हा दाखल केला.
बलात्कार प्रकरणी सेशन कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर हे प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बृजराज सिंह यांच्या खंडपीठाकडे गेलं. यावेळी त्या युवकाने मुलीच्या कुंडलीत मंगळ दशा असल्याने तिच्यासोबत लग्नाला नकाल दिला असं न्यायालयाला सांगितलं. यावर उच्च न्यायालयाने त्या मुलीला खरोखरच मंगळ आहे का याची चाचपणी करण्यासाठी हे प्रकरण लखनौ विद्यापीठाच्या अॅस्ट्रोलॉजी विभागाकडे पाठवून दिलं. (Allahabad High Court order to examine a woman s kundali to ascertain whether she is a mangalik).
सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल
अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्या मुलीला मंगळ आहे की नाही हे तपासण्यासाठी अॅस्ट्रोलॉजी विभागाकडे प्रकरण पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर याची दखल आता सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो दखल घेत या प्रकरणाची आज तातडीने सुनावणी घेतली. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण लखनौ अॅस्ट्रॉलॉजी विभागाकडे पाठवण्याच्या अलाहाबाद न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली आहे. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आता या प्रकरणी पुढील सुनावणीची तारीख दिली आहे.
#BREAKING Supreme Court takes suo Motu cognisance of the LiveLaw report about Allahabad High Court order directing the astrology department to examine a woman's kundali to ascertain whether she is a mangalik
— Live Law (@LiveLawIndia) June 3, 2023
Special sitting at 3 PM today. pic.twitter.com/aPF1D2wKGe
बलात्कार करताना 'मंगळ' चालतो का?
शारिरीक संबंध ठेवताना एखादी मुलगी कोणत्याही धर्माची असो, वा जातीची असो किंवा तिला मंगळ असो, त्यावेळी काही फरक पडत नाही, पण लग्नाच्या वेळी या गोष्टी कशा आडव्या येतात असा प्रश्न आता सोशल मीडियावर विचारण्यात येत आहे. या प्रकरणी सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
ही बातमी वाचा: