एक्स्प्लोर
न्यायमूर्तींच्या नाराजीचं कारण असलेलं जज लोया मृत्यू प्रकरण काय आहे?
सोहराबुद्दीन केसशी लोया यांचा असलेला संबंध आणि त्यांचा अचानक मृत्यू यावरुन संशय उपस्थित केले गेले.
![न्यायमूर्तींच्या नाराजीचं कारण असलेलं जज लोया मृत्यू प्रकरण काय आहे? Supreme Court Judges Vs CJI : all you need to know about Judge BH Loya Death Case latest update न्यायमूर्तींच्या नाराजीचं कारण असलेलं जज लोया मृत्यू प्रकरण काय आहे?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/11124426/CBI-Judge-B-H-Loya.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात सुनावणी करणारे विशेष सीबीआय जज बी. एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्यावरुन मोठा वादंग माजला आहे. सुप्रीम कोर्टाच्या चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासन व्यवस्थित काम करत नसल्याचा आरोप केला. जज लोया यांच्या संशयास्पद मृत्यूचं प्रकरण हेही न्यायमूर्तींच्या नाराजीचं कारण असल्याचं जस्टिस गोगोई यांनी सांगितलं.
सरन्यायाधीशांवर प्रश्न उपस्थित करणारे चार न्यायमूर्ती कोण आहेत?
चीफ जस्टिस दीपक मिश्रा आणि जस्टिस ए एम खानविलकर, जस्टिस डी व्हाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने बी. एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशीवर तात्काळ सुनावणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी केली. खंडपीठाने यावरील सुनावणी 15 जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे.सुप्रीम कोर्ट नीट काम करत नाही, खुद्द न्यायमूर्तींची हतबलता
लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी महाराष्ट्रातील पत्रकार बी. आर. लोणे यांनी केली आहे. या प्रकरणात विविध पोलिस अधिकारी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांचं नाव आहे.बी. एच. लोया यांचा संशयास्पद मृत्यू
नागपुरात 1 डिसेंबर 2014 रोजी जज ब्रिजमोहन हरिकिशन लोया यांचा मृत्यू झाला होता. सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नाला जाताना हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं होतं. मात्र लोया यांच्या बहिणीने त्यांच्या मृत्यू प्रकरणी प्रश्न उपस्थित केले होते. सोहराबुद्दीन केसशी लोया यांचा असलेला संबंध आणि त्यांचा अचानक मृत्यू यावरुन संशय उपस्थित केले गेले.सोहराबुद्दीन प्रकरणातील जजच्या मृत्यू प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी
जज लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका 8 जानेवारी रोजी बॉम्बे लॉयर्स असोसिएशनकडून मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. यावर 23 तारखेला हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरण गुजरातमध्ये सोहराबुद्दीन शेख, त्यांची पत्नी कौसर बी आणि त्यांचे सहकारी तुलसीदास प्रजापती यांचा नोव्हेंबर 2005 मध्ये कथित बनावट चकमकीत मृत्यू झाला होता. पोलिस कर्मचाऱ्यांसह 23 आरोपींवर या प्रकरणी केस दाखल आहे. हे प्रकरण आधी सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं, त्यानंतर ते मुंबईला ट्रान्सफर करण्यात आलं.सरकारसमोर झुकू नका, सरकारला झुकवा : कोळसे-पाटील
"सुप्रीम कोर्टाचा गेल्या दोन महिन्यातील कारभार व्यथित करणारा आहे. काही महिन्यांपासून सुप्रीम कोर्ट प्रशासन नीट काम करत नाही. याबाबत मुख्य न्यायमूर्तींसमोर प्रश्न मांडले, पण काहीच उपयोग झाला नाही", अशी हतबलता दुसऱ्या-तिसऱ्या कोणी नाही तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी मांडली.PHOTO : न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेतील 6 महत्त्वाचे मुद्दे
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली. न्यायमूर्ती कुरियन जोसेफ, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती जे चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी पत्रकार परिषद घेतली. न्यायमूर्ती नेमकं काय म्हणाले? पत्रकार परिषद बोलावताना आम्हाला अजिबात आनंद होत नाही. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून न्यायव्यवस्थेत जे काय सुरु आहे, ते व्यथित करणारं आहे. सुप्रीम कोर्ट प्रशासनाचं कामकाज सुरळीत होत नाही. याबाबत आम्ही सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पत्रही लिहिलं. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सरन्यायाधीशांना लिहिलेलं पत्र सार्वजनिक करणार आहोत. आम्ही आमचा आत्मा विकला, असं आम्हाला भविष्यात कोणीही बोलू नये. न्यायव्यवस्था टिकली नाही, तर लोकशाही टिकून राहणार नाही.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)