एक्स्प्लोर

Supreme Court : '14 दिवस काहीच का झालं नाही?' मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

Supreme Court : मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी करण्यात आली आहे. या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सरकारला अनेक सवाल केले आहेत.

Supreme Court On Manipur Viral Video:  मणिपूरमधील (Manipur) हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचाराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)  सुनावणी सुरु आहे. दरम्यान सोमवारची सुनावणी संपली आहे. या सुनावणी दरम्यान  सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सरकारला अनेक कठोर सवाल केले आहेत. यावेळी सर्वेच्च न्यायालयाने विचारलं की, "4 मे रोजीच्या घटनेवर पोलिसांनी 18 मे रोजी एफआयआर नोंदवला. 14 दिवस काहीही का झाले नाही?' तसेच सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना देखील अनेक सवाल केले आहेत. 'हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन महिलांवर बलात्कार झाल्याची आणि त्यांची विवस्त्र धिंड काढल्याची घटना समोर आली आहे. हे सगळं सुरू असताना पोलीस काय करत होते?' असा सवाल न्यायालयाने पोलिसांना केला आहे.  

कोर्टातील युक्तीवाद काय?

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे की, 'समजा 1000 महिलांवरील गुन्हे आहेत. सीबीआय सर्वांची चौकशी करू शकणार आहे का?' यावर उत्तर देताना सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सीबीआयच्या सहसंचालक दर्जाच्या एका महिला अधिकारी या तपासासाठी नियुक्त करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच अॅटर्नी जनरल आर वेंकटरामानी यांनी सांगितले की, 'मंगळवारी सरकार प्रत्येक प्रकणातील तथ्यांसह माहिती न्यायालयात हजर करेल.' 

सर्वोच्च न्यायालायने मागितली एफआयआरची माहिती

सरन्यायाधाशांनी एफआयआर विषयी देखील माहिती सादर करण्यास सांगितले आहे. यावर बोलतांना त्यांनी म्हटलं की, "आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की 6000 FIR चे वर्गीकरण कसे करण्यात आले आहे.  किती झीरो FIR आहेत, काय कारवाई करण्यात आली आहे, किती जणांना अटक करण्यात आली आहे? असे अनेक सवाल सर्वेच्च न्यायालयाने विचारले आहेत. तसेच या प्रकरणावर मंगळवारी पुन्हा सुनावणी होणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान कलम 370 नुसार या प्रकरणावर सुनावणी सुरु होणार आहे. यावर उत्तर देताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, मंगळवार सकाळपर्यंत  एफआयआरबद्दल सर्व माहिती उपलब्ध करणे कठिण आहे. 

सरन्यायाधीशांचे कठोर सवाल

या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी सरकारला अनेक कठोर सवाल केले आहेत. पीडित महिलांचे जबाब कोण नोंदवणार? असा सवाल देखील सर्वोच्च न्यायालयाने सरकारला केला आहे. एक 19 वर्षीय महिला जी मदत शिबिरात आहे, तिचे वडिल आणि भाऊ मारले गेल्याने ती घाबरलेली आहे त्यामुळे तिला न्यायालयीने प्रक्रिया शक्य होईल का असा कठोर सवाल देखील त्यांनी विचारला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

INDIA MP Manipur Visit : राजकारण करायला नव्हे पिडितांचे अश्रू पुसायला आलोय, मणिपूर भेटीनंतर काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP MajhaNilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली!  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Embed widget