(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारतीय हवाईदलात सहभागी होणार ब्रह्मोस मिसाइल असलेलं 'सुखोई फाइटर जेट'
तमिळनाडूतील तंजावूर येथे 20 जानेवारीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या समारंभात ब्राह्मोस क्षेपणास्त्राने सज्ज असलेलं सुखोई लढाऊ विमानाचा भारतीय वायुसेनेत समावेश करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : हिंदी महासागराची सुरक्षा वाढवण्यासाठी ब्राह्मोस क्षेपणास्त्राने सज्ज असलेलं सुखोई लढाऊ विमानाचा भारतीय वायुसेनेत समावेश करण्यात येणार आहे. 20 जानेवारीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा समारोह तमिळनाडूतील तंजावूर येथे पार पडणार आहे. एअर मार्शल अमित तिवारी यांनी बुधवारी यासंदर्भात माहिती दिली.
वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, तंजावूर स्थित टायगर शार्क स्कॉवड्रनला हिंदी महासागराची सुरक्षा लक्षात घेऊन त्या दृष्टीने तयार करण्यात आलं आहे. जिथे दक्षिण भारतात सुखोई विमानं पहिल्यांदा तैनात करण्यात येणार आहेत. ब्राह्मोस क्षेपणास्त्राने सज्ज असलेलं सुखोई लढाऊ विमानाच्या मदतीने हिंदी महासागराची सुरक्षा राखण्यास खास मदत होणार असल्याचंही त्यांनी बोलताना सांगितलं आहे. कारण सुखोई विमानांची रेंज जवळपास 1000 किलोमीटर आहे आणि यामध्ये असलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची रेंज जवळपास 3000 किलोमीटर आहे.
जगुआर नंतर सुखोई वायुसेनेत दाखल होणारं असं फायटर जेट आहे, जे 'मेरीटाइम-ऑपरेशन्स'साठी तयार करण्यात आलं आहे. हे वृत्त अशा वेळी आलं आहे, जेव्हा भारताचं स्वदेशी लढाऊ विमान, एलसीए (नेव्ही) ने एअरक्राफ्ट कॅरियर, आयएनएस विक्रमादित्यावर यशस्वीपणे टेकऑफ आणि लँडिग केलं आहे. दरम्यान, तमिळनाडूतील सुलुर एलसीए तेजसचीही एक स्कॉवड्रन आहे.
वायुसेनेने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की, 222 स्कावड्रान द टायगर शार्क ला सुखोईसोबत एक जानेवारी रोजी पुन्हा सहभागी करण्यात येईल. या स्कावड्रानची स्थापनची स्थापना 15 सप्टेंबर 1969 रोजी एका सुखोई लढाऊ एसयू-7 सोबत करण्यात आली होती. काही दिवसांनी यामध्ये मिग-27 लढाऊ विमानांमध्ये सहभागी करण्यात आलं होतं. अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, पुन्हा नव्याने तयार करण्यात आलेली 222 स्कॉवड्रन ब्राह्मोसयुक्त सुखोई-30 लढाऊ विमानांची असणार आहे. या विमानांमध्ये दोन इंजिन असणार आहेत.
दरम्यान, तमिळनाडूची राजधानी चेन्नईपासून जवळपास 350 किलोमीटर दूर असणारं तंजावूर, प्राचीन काळात चोल राजधानी होती. चोल राजांचं साम्राज्य संपूर्ण दक्षिण-पूर्व आशियाई देशांपर्यंत पोहोचलं होतं.
संबंधित बातम्या :
कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच 36 केंद्रीय मंत्री करणार जम्मू-काश्मीरचा दौरा
राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांची दिल्लीत भेट
निर्भया प्रकरणातील आरोपींना 22 जानेवारीला फाशी नाही....
देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी लक्ष्मीदेवीचा फोटो नोटांवर छापा : सुब्रमण्यम स्वामी