एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच 36 केंद्रीय मंत्री करणार जम्मू-काश्मीरचा दौरा
जम्मू-काश्मीरमध्ये ज्या प्रकारच्या खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत किंवा जम्मू-काश्मीरचा विकास योग्य प्रकारे कसा करता येईल, याविषयी माहिती देण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे.
नवी दिल्ली : जम्मू - काश्मीरमधून कलम 370 लागू करून पाच महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला आहे. केंद्र व स्थानिक प्रशासन परिस्थिती सामान्य करण्यासाठी सर्व पावले उचलत आहे. आता यासंदर्भात 36 केंद्रीय मंत्री वेगवेगळ्या दिवशी जम्मू-काश्मीरला भेट देणार आहे. हे मंत्री जम्मू-काश्मीरमधील लोकांना कलम 370 मधील तरतुदी, रद्द करण्यासंबंधीचे सकारात्मक परिणाम आणि या क्षेत्रासाठी सरकारच्या विकासाच्या धोरणांबद्दल सांगणार आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये ज्या प्रकारच्या खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत किंवा जम्मू-काश्मीरचा विकास योग्य प्रकारे कसा करता येईल, याविषयी माहिती देण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे. 17 जानेवारीला मोदींच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांचा जम्मू-काश्मीचा दौरा निश्चित होणार आहे. मंत्र्यांचा जम्मू-काश्मीर दौरा 18 ते 25 जानेवारी दरम्यान होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल जम्मू आणि काश्मीरच्या केंद्र शासित प्रदेशात 19 जानेवारीला भेट देण्याची शक्यता आहे. Navneet Rana | राणा दाम्पत्याने लुटला पतंगबाजीचा आनंद, संक्रांतीनिमित्त घेतला उखाणा | अमरावती | ABP Majha मोदी सरकारने गेल्या वर्षी 5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविण्याची घोषणा केली. तसेच केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला दोन केंद्रशासित प्रदेशा (जम्मू-काश्मीर आणि लडाख) मध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला होता. संबंधित बातम्या : देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी लक्ष्मीदेवीचा फोटो नोटांवर छापा : सुब्रमण्यम स्वामी बॉक्स ऑफिसवरच नाही तर गुगलच्या ट्रेंडमध्येही 'तानाजी' 'छपाक'च्या वरचढ36 Union Ministers to visit Jammu & Kashmir from 18th-25th January to spread initiatives & policies of the government with regard to development of the UT & people, especially in the last 5 months, after the abrogation of Article 370 & bifurcation of J&K into Union Territories.
— ANI (@ANI) January 15, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement