(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agni 4 Successfully Tested: अग्नी-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, 4000 किमीपर्यंत शत्रूवर मारा करण्याची क्षमता
Ballistic Missile Agni 4 Successfully Tested: देशाच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडने (SFC) आज ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून इंटरमीडिएट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-4 ची यशस्वी चाचणी केली. अग्नी-4 ची रेंज सुमारे 4000 किमी आहे.
Ballistic Missile Agni 4 Successfully Tested: भारताने अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम असलेल्या अग्नी-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, अग्नी-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावर करण्यात आली. अग्नी-4 क्षेपणास्त्र 4,000 किमीपर्यंतच्या लक्ष्यावर मारा करू शकते. याआधी भारताने अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेल्या अग्नी-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. याची मारक क्षमता 5000 किमी इतकी आहे.
संध्याकाळी 7.30 च्या सुमारास ही चाचणी घेण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाने एका संक्षिप्त निवेदनात म्हटले आहे. अग्नी-4 ची यशस्वी चाचणी भारताच्या विश्वसनीय किमान प्रतिबंधच्या धोरणाची पुष्टी करते, असे निवेदनात म्हटले आहे. मंत्रालयाने सांगितले की, चाचणीने सर्व ऑपरेशनल पॅरामीटर्स तसेच सिस्टमची विश्वासार्हता सिद्ध केली.
A successful training launch of an Intermediate-Range Ballistic Missile, Agni-4, was carried out at approximately 1930 hours today from APJ Abdul Kalam Island, Odisha. The launch validated all operational parameters as also the reliability of the system: Defence Ministry pic.twitter.com/bcwOs2KkXU
— ANI (@ANI) June 6, 2022
अलीकडेच, भारतीय नौदलाने 'सीकिंग हेलिकॉप्टर'मधून पहिल्या स्वदेशी विकसित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती. ओडिशातील बालासोर येथील एकात्मिक चाचणी श्रेणी (ITR) येथे ही चाचणी घेण्यात आली. त्यावेळी, भारतीय नौदल आणि अंदमान निकोबार कमांडने संयुक्तपणे 'सुपरसॉनिक क्रूझ' क्षेपणास्त्र ब्रह्मोसच्या आवृत्तीची (BrahMos supersonic cruise missile) यशस्वी चाचणी घेतली.
इतर महत्वाच्या बातम्या:
Elon Musk on Twitter: इलॉन मस्क यांनी ट्विटर डील रद्द करण्याचा दिला इशारा, डेटा लपवल्याचा आरोप
Norovirus In Kerala : केरळमध्ये नोरोव्हायरसचे 2 रुग्ण आढळले; या विषाणूची नेमकी लक्षणं कोणती? जाणून घ्या
Varanasi serial blasts: वाराणसीमधील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी आरोपी वलीउल्लाहला फाशीची शिक्षा, गाझियाबाद न्यायालयाचा निर्णय