एक्स्प्लोर
सोनिया गांधींच्या 10 जनपथवरील बंगल्यातून एसपीजी कमांडो बेपत्ता
पोलिसांच्या माहितीनुसार, बेपत्ता कमांडोचं नाव राकेश कुमार असून तो 31 वर्षांचा आहे. हा कमांडो द्वारकामधील सेक्टर-8 मध्ये भाड्याने घर घेऊन राहतो.
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) एसपीजी कमांडो मागील तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. या बातमीनंतर सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे.
हा एसपीजी कमांडो सोनिया गांधींच्या सरकारी निवासस्थान 10 जनपथमध्ये तैनात होता आणि तो 3 सप्टेंबरपासून बेपत्ता आहे. तुघलक रोड पोलिस या कमांडोचा शोध घेत आहेत, परंतु अद्याप त्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी हा एसपीजी कमांडो वर्दी घालून 10 जनपथवर दाखल झाला, त्या दिवशी तिथे त्याची ड्यू़टीही नव्हती. ड्यूटी नसतानाही सरकारी वर्दीत सोनिया गांधींच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर तो गायब कसा झाला, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. पोलिस आता एसपीजी कमांडोशी संबंधित माहिती मिळवत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, बेपत्ता कमांडोचं नाव राकेश कुमार असून तो 31 वर्षांचा आहे. हा कमांडो द्वारकामधील सेक्टर-8 मध्ये भाड्याने घर घेऊन राहतो.
पोलिस तपासानुसार, राकेश द्वारकामधील त्याच्या घरातून 1 सप्टेंबर रोजी बाहेर पडला होता. यावेळी त्याने सरकारी वर्दी परिधान केली होती. राकेश कुमार 10 जनपथवर पोहोचला. तिथे तो इतर जवानांनाही भेटला, परंतु काही वेळाने तिथून निघून गेला. तो कुठे गेला हे कोणालाही माहित नाही किंवा त्यानेही कोणाला कळवलं नाही.
10 जनपथवरुन बाहेर पडताना तो त्याचं सर्व्हिस रिव्हॉल्व्हरही घेऊन गेला नाही. शिवाय त्याने फोनही तिथेच ठेवला होता. त्यामुळे फोन ट्रेस करुन त्याच्या ठिकाणाचा शोध घेणंही पोलिसांना कठीण जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement