एक्स्प्लोर

Sonia Gandhi Birthday : सोनिया गांधी यांचा आज वाढदिवस, जाणून घ्या राजीव-सोनिया यांची भन्नाट प्रेमकहाणी

Sonia Gandhi Birthday: देशासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात सोनिया गांधी यांचा मोठा वाटा आहे. त्यांना ही प्रेरणा मिळाली ती त्यांचे पती राजीव गांधी यांच्याकडून. या दोघांची लव्हस्टोरी भन्नाट आहे. 

Sonia Gandhi Birthday : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आज वाढदिवस. आज त्या 75 वर्षाच्या झाल्या आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  सोनिया गांधी यांचा जन्म 9 डिसेंबर 1946 साली इटलीमध्ये झाला. कॉंगेस पक्षाची वाताहत झाली असताना, पक्ष विखुरला गेला असताना 1998 साली त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यानंतर 2004 साली अनेक पक्षांशी आघाडी करुन सोनिया गांधींनी कॉंग्रेसला सत्तेत आणले. त्या 1998 ते 2017 सालापर्यंत कॉंग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या आहेत. कॉंग्रेसच्या इतिहासात सर्वाधिक काळ अध्यक्षपदी राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. आताही राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर सोनिया गांधींकडे कॉंग्रेसचे अंतरिम अध्यक्षपद आहे. 

मूळ इटलीच्या असलेल्या सोनिया गांधी यांचं भारतप्रेम सर्वश्रुत आहे. देशासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांना ही प्रेरणा मिळाली ती अर्थातच त्यांचे पती राजीव गांधी यांच्याकडून. या दोघांची लव्हस्टोरी भन्नाट आहे. 

राजीव गांधी केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते. त्याचवेळी एक इटालियन युवती इंग्रज कुटुंबात पेइंग गेस्ट म्हणून राहून शिक्षण पूर्ण करत होती. तिला सारखा एकटेपणा छळायचा आणि घरच्यांची राहून राहून आठवण यायची. इंग्रजांच्या शहरात राहून इंग्रजी न येणं ही मोठी अडचण भरीस भर होतीच. इटालियन पदार्थांच्या शोधात ती एका कॉन्टिनेंटल रेस्तरॉमध्ये गेली. तिथे तिला मायदेशातील पदार्थ तर नाही मिळाले, पण एका युवकाशी तिची भेट झाली. त्या युवकाचं नावं होतं राजीव. वर्सिटी नावाच्या रेस्तरॉमध्ये केम्ब्रिजमधले विद्यार्थी दररोज संध्याकाळी वेळ घालवण्यासाठी यायचे. विद्यार्थ्यांच्या गोंधळात तिचं लक्ष मात्र राजीवकडेच खिळलेलं असायचं. मोठे काळेभोर डोळे, निरागस आणि मनमोहक हास्य असलेला तरुण, असं राजीव यांचं वर्णन सोनिया करतात.

जर्मनीहून आलेल्या क्रिश्चियन नावाच्या एका कॉमन मित्राच्या मदतीने राजीव यांनी सोनियांशी ओळख वाढवली. क्रिश्चियन फाडफाड इटालियन बोलायचा. लंच घेताना त्याने सोनिया आणि राजीव यांची ओळख करुन दिली. सोनियांना व्हॅलेंटाईन डेचं फारसं कौतुक नाही. खरं तर तेव्हाच राजीवनी त्यांना प्रपोज केलं. मात्र ज्यादिवशी दोघांच्या मनात प्रेमाचा अंकुर रुजला, तोच आपला व्हॅलेंटाईन्स डे, असं सोनिया मानतात.

पहिल्यांदा आमची जवळून नजरानजर झाली. मी माझ्या धडधडणाऱ्या हृदयाचा आवाज ऐकू शकत होते. माझ्या मते, हे पहिल्या नजरेतलं प्रेम होतं. नंतर राजीव यांनी मला सांगितलं की त्यांच्यादृष्टीनेही हे लव्ह अॅट फर्स्ट साईट होतं, असं सोनिया सांगतात. 

प्रेमाचा पुढचा टप्पा म्हणजे लग्न. मात्र हा पल्ला गाठणं राजीव गांधींसाठी सोपं नव्हतं. एका वर्षाने राजीव सोनियांच्या वडिलांच्या भेटीसाठी ऑरबेसेनोला गेले. सोनियांचे वडील अर्थात मैनो स्टीफेनोशी त्यांची भेट झाली. राजीव यांनी भेटीत थेट मुद्द्याला हात घातला. मला तुमच्या मुलीचा हात हवा आहे, अशी मागणीच घातली. स्टीफेनोंचा मात्र परदेशी व्यक्तीवर विश्वास नव्हता. आपल्या मुलीशी लग्न करण्याचा राजीव यांचा निर्धार त्यांनी हेरला, मात्र आपली मुलगी अख्खं आयुष्य भारतात कसं घालवेल, याची काळजी त्यांना लागून राहिली.

राजीव गांधींची परीक्षा घेण्यासाठी स्टीफेनो यांनी एक अट घातली. एक वर्ष राजीव आणि सोनियांनी एकमेकांची अजिबात भेट घ्यायची नाही. त्यानंतर दोघांना एकमेकांसोबत आयुष्य घालवायचं आहे का, याचा निर्णय घ्यावा. हे एखाद्या फिल्मी स्टोरीपेक्षा वेगळं नाही. एक वर्ष एकमेकांपासून दूर राहणं, हा विरहाचा काळ राजीव आणि सोनिया यांच्यासाठी सर्वात कठीण होता. मात्र एक वर्षानंतर ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. दोघांनीही लग्नाचा निर्णय सोनियांच्या वडिलांना ऐकवला. स्टीफेनो शब्दांना जागणारे होते. राजीव यांचं म्हणणं ऐकण्यावाचून त्यांच्यासमोर कोणताही पर्याय नव्हता. मात्र ते या लग्नाला हजर राहिले नाहीत.

आता सोनिया गांधींना संघर्षाला सामोरं जायचं होतं. इंदिरा गांधी आणि सोनिया यांची भेट लंडनमध्ये निश्चित झाली. सोनियांच्या मनात या भेटीबाबत घालमेल सुरु होती. मात्र इंडिया हाऊसमध्ये ठरलेली ही भेट पुढे ढकलली गेली. इंदिरा गांधींना सोनियांच्या भावना समजत होत्या. सोनियांना इंग्रजी बोलण्यात अडचण येईल, हे समजून त्यांनी फ्रेंचमध्ये बोलायला सुरुवात केली. इंदिरांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला समजून घेतल्याचं सोनिया सांगतात. 13 जानेवारी 1968 ला सोनिया दिल्लीला आल्या. 12 दिवसांनी एका छोटेखानी समारंभात त्यांचा साखरपुडा झाला. तिथेच त्यांच्या हातावर मेहंदी लागली. 25 फेब्रुवारी 1968 ला 1 सफदरगंज रोडच्या लॉनवर दोघं विवाहबंधनात अडकले. देशातील प्रतिष्ठित कुटुंबांपैकी अग्रगण्य असलेल्या गांधी कुटुंबाच्या परदेशी सुनेची ही कहाणी. ती सून भारताची झाली आणि प्रेमावर तिने आयुष्य कुर्बान केलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!
Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!
पालघरमध्ये महायुती वि. महाविकास आघाडी असाच सामना; महायुतीला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता
पालघरमध्ये महायुती वि. महाविकास आघाडी असाच सामना; महायुतीला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता
NCP : राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
Maharashtra vidhansabha election 2024 विधानसभा निवडणुका यंदा उशिरा; 2019 मध्ये कधी झालं मतदान अन् निकाल?
विधानसभा निवडणुका यंदा उशिरा; 2019 मध्ये कधी झालं मतदान अन् निकाल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!Marathwada Vidhansabha : मराठवाड्यात मुंडे, अशोक चव्हाण, दानवे, खोतकरांची प्रतिष्ठा पणालाWest Maharashtra Vidhansabha : पश्चिम महाराष्ट्रात तुतारी वाजणार की कमळ फुलणार?Mahayuti Seat Sharing : मुख्यमंत्रिपद दिलं, शिंदेजी एवढं कराच! हिशेबाचे धागे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!
Aaditya Thackeray Profile Story : ठाकरेंचा वारसदार ते सेनेचा सरदार! आदित्य ठाकरे यांचा पूर्ण प्रवास!
पालघरमध्ये महायुती वि. महाविकास आघाडी असाच सामना; महायुतीला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता
पालघरमध्ये महायुती वि. महाविकास आघाडी असाच सामना; महायुतीला गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता
NCP : राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला, काहीच मदत केली नाही; धाराशिवमधील नेत्याची खदखद
Maharashtra vidhansabha election 2024 विधानसभा निवडणुका यंदा उशिरा; 2019 मध्ये कधी झालं मतदान अन् निकाल?
विधानसभा निवडणुका यंदा उशिरा; 2019 मध्ये कधी झालं मतदान अन् निकाल?
ऐन निवडणुकीत भाजपने केली हकालपट्टी; आता माघार नाही, माजी आमदाराने पक्षाविरुद्ध ठोकला शड्डू
ऐन निवडणुकीत भाजपने केली हकालपट्टी; आता माघार नाही, माजी आमदाराने पक्षाविरुद्ध ठोकला शड्डू
Solapur : सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
सोलापुरात शरद पवारांचा सहा जागांवर दावा, ठाकरे-काँग्रेस काय करणार? बंडखोरीची शक्यता
निवडणुकांची घोषणा होताच इम्तियाज जलिलांनी घेतली जरांगेंची भेट; राजकीय युतीवर झाली चर्चा?
निवडणुकांची घोषणा होताच इम्तियाज जलिलांनी घेतली जरांगेंची भेट; राजकीय युतीवर झाली चर्चा?
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
पालघरमध्ये 3.5 रेश्टर स्केलचा भूकंप; भरदुपारी नागरिकांनी घराबाहेर ठोकली धूम
Embed widget