एक्स्प्लोर
राहुलजी, छोटा भीमलाही कळतं ही हेरगिरी नाही : स्मृती इराणी
'अॅपकडून वैयक्तिक माहिती अॅक्सेस करण्याबाबत मागितलेली परवानगी म्हणजे हेरगिरी नाही, हे तर छोटा भीमलाही माहित आहे' असा टोला स्मृती इराणींनी राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन लगावला.
नवी दिल्ली : भाजपच्या वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. 'अॅपकडून वैयक्तिक माहिती अॅक्सेस करण्याबाबत मागितलेली परवानगी म्हणजे हेरगिरी नाही, हे तर छोटा भीमलाही माहित आहे' असा टोला स्मृती इराणींनी ट्विटरवरुन लगावला.
डेटा शेअरिंगवरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये रंगलेलं तुंबळ युद्ध सुरुच आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीयांची हेरगिरी करण्याची आवड असलेले बिग बॉस आहेत' अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. त्याला उत्तर देताना स्मृती इराणी यांनी 'छोटा भीम' या कार्टून कॅरेक्टरचा आधार घेतला.
.@RahulGandhi ji, even ‘Chhota Bheem’ knows that commonly asked permission on Apps don’t tantamount to snooping.
— Smriti Z Irani (@smritiirani) March 26, 2018
स्मृती इराणी इतक्यावरच थांबल्या नाहीत. 'तुम्ही सांगता, त्याच्या विरुद्धच तुमची टीम वागते, असं दिसतंय. नमो अॅप डिलीट करण्याऐवजी काँग्रेस अॅपच डिलीट केलेलं दिसतंय' असं स्मृती म्हणाल्या.Now that we're talking tech, would you care to answer @RahulGandhi ji why Congress sends data to Singapore Servers which can be accessed by any Tom, Dick and Analytica? pic.twitter.com/U5YLTckBsf
— Smriti Z Irani (@smritiirani) March 26, 2018
काय आहे प्रकरण? नरेंद्र मोदी यांचं अधिकृत मोबाईल अॅप 'नमो'च्या माध्यमातून भारतीयांचा डेटा अमेरिकेतील कंपन्यांना विकला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. मात्र काँग्रेस पक्षाच्या अधिकृत अॅपमधून भारतीयांचा डेटा सिंगापूरला जात असल्याचा दावा फ्रान्सच्या हॅकरने केला. त्यामुळे काँग्रेस तोंडघशी पडली.Ye kya @RahulGandhi ji it seems your team is doing the opposite of what you asked for. Instead of #DeleteNaMoApp, they have deleted the Congress App itself 😂 pic.twitter.com/NrbMxz57gs
— Smriti Z Irani (@smritiirani) March 26, 2018
डेटा विकल्याचा आरोप, काँग्रेसने पक्षाचं अॅप गुगल प्ले स्टोअरवरुन हटवलं
केम्ब्रिज अॅनालिटिकाने फेसबुकच्या माध्यमातून यूझर्सची वैयक्तिक माहिती चोरल्याचं समोर आलं होतं. फेसबुकनेही आपली चूक झाली असल्याचं मान्य केलं. त्यामुळे तुमचा-आमचा डेटा सोशल साईट्सवर किती सुरक्षित आहे, असा प्रश्न निर्माण झाला.नमो अॅप युझर्सचा डेटा अमेरिकन कंपन्यांकडे, राहुल गांधींचा आरोप
काँग्रेस 2019 च्या निवडणुकीची तयारी केम्ब्रिज अॅनालिटिकासोबत करत असल्याचा आरोप केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला होता. त्यानंतर काँग्रेसने भाजपवर निशाणा साधणं सुरु केलं. कायदेमंत्री खोट्या बातम्या पसरवत असल्याचं राहुल गांधी म्हणाले होते.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement