Sidhu Moose Wala Murder : सिद्धू मुसेवाला यांना गोळी मारणाऱ्यांची ओळख पटली, दोन्ही शार्प शूटर्स सोनिपतचे रहिवासी
Sharp Shooters in Sidhu Moose Wala Murder: सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरु आहे. यामध्ये अनेक अपडेट समोर येत आहेत.
Sidhu Moose Wala Murder Case : पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांना गोळया मारणाऱ्या शार्प शूटर्सची ओळख पटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुसेवाला यांना गोळी मारणारे संशयित आरोपी सोनिपतमधील रहिवासी आहेत. प्रियवत फौजी आणि अंकित सेरसा यांची नावं समोर येत आहेत. या दोन्ही आरोपींची एक सीसीटीव्ही फुटेज समोर आली आहे. यामध्ये हे दोघे पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरताना दिसत आहेत.
फतेहाबादमधील पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर प्रियव्रत फौजी आणि अंकित सेरसा हे दोघेही शार्प शूटर सोनीपतचे रहिवासी असल्याचं समोर आलं आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्येसंदर्भात पोलिसांकडून जलद गतीनं तपास सुरु आहे. पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, दिल्लीची नंबर प्लेट असलेल्या कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी दोघे संशयित आरोपी फतेहाबादच्या बिसला गावातील पेट्रोल पंपावर पोहोचले होते.
मुसेवालावर गोळ्या झाडणाऱ्या शार्प शूटर्सची ओळख?
पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, बोलेरो जीप पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर थांबते. दोन जण गाडीतून खाली उतरतात. प्रियव्रत फौजी आणि अंकित सेरसा हे दोन शार्प शुटर्स सोनीपतचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 18 मार्च 2021 रोजी सोनीपतमध्ये गँगस्टर बिट्टू बरोनाच्या वडिलांच्या हत्या प्रकरणात प्रियव्रत फौजी सहभागी होता. तो सिसाणा गडी येथील रहिवासी आहे.
शार्प शुटर्स प्रियवत फौजी कोण आहे?
अंकित सेरसा या विरोधात सोनपत पोलिसांकडे कोणताही गुन्ह्याचा इतिहास नाही. प्रियव्रत फौजी हा देखील रामकरण टोळीचा शार्प शूटर आहे. त्याच्यावर दोन खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. हल्ल्याच्या वेळी मारेकरी बोलेरोमध्ये होते, असं सांगितलं जात आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी कॅनडामध्ये बसलेल्या लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या टोळ्यांचीही नावं समोर आली होती. गँगस्टर गोल्डी ब्रारने सोशल मीडिया पोस्टद्वारे या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या