Corona Symptoms : लाँग कोविड रुग्णांमध्ये नवीन लक्षण, माणसांचे चेहरे ओळखण्यात अडचण
Long Covid Cause Face Blindness : कोरोना रुग्णांना आता चेहरे ओळखता येत नाहीत. लोक आपल्या माणसांचे चेहरे देखील विसरत आहेत. अलीकडेच एक अभ्यासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Long Covid Symptoms : कोरोना महामारी सुरु झाल्यापासून रुग्णांमध्ये वेगवेगळी लक्षणं पाहायला मिळाली आहेत. कोविड रूग्णांमध्ये आतापर्यंत फक्त हृदय, फुफ्फुस, किडनीवर परिणाम दिसून येत होता. मात्र, आता कोरोना विषाणूचा न्यूरो सिस्टमवर (Neuro System) म्हणजे मज्जासंस्थेवर परिणाम होऊ लागला आहे. कोरोना रुग्णांना आता चेहरे ओळखता येत नाहीत. लोक आपल्या माणसांचे चेहरे देखील विसरत आहेत. अलीकडेच एका अभ्यासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका संशोधनानुसार, दीर्घकाळापर्यंत कोविड ग्रस्त लोकांमध्ये (Long Covid Symptoms) देखील ही लक्षणं दिसत आहेत.
Long Covid Symptoms : लाँग कोविडची लक्षणे
कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला. मार्च 2020 मध्ये भारतात लॉकडाऊन लागू करण्यात आला. कोरोनाच्या डेल्टा त्यानंतर ओमायक्रॉन प्रकाराने देशात कहर केला. लाखो लोक विषाणूला बळी पडले. अजूनही या विषाणूचा कहर सुरुच आहे. कोरोना झाल्यानंतर बऱ्याच काळाने ही लक्षणे जाणवतात. या लाँग कोविडची आता विचित्र लक्षण दिसू लागली असून ही चिंतेची बाब आहे.
What is Long Covid : 'लाँग कोविड' म्हणजे काय?
कोरोनाची लागण होऊन गेल्यानंतर सहा महिने ते एक वर्षापर्यंत त्याची लक्षणे दिसून येतात. यालाच लाँग कोविड असं म्हटलं जातं. सुरुवातीच्या काळात थकवा येणे, कमी हालचालीनंतरही श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला, स्नायूदुखी ही लाँग कोविडची सर्वसाधारण लक्षणं पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता काळानुसार, या लक्षणांमध्ये बदल होत आहे.
Long Covid Symptoms : चेहरा ओळखण्यात अडचण
जे लाँग कोविडशी झुंज देत आहेत म्हणजेच कोरोना होऊन गेल्यानंतर या रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येतात. यातील एक नवी समस्या आता समोर आली आहे. लाँग कोविडमुळे रुग्णांना चेहरा ओळखण्यात अडचणी येत आहेत. या समस्येमध्ये रुग्णांना त्यांच्या निकटवर्तीय लोकांना ओळखण्यात अडचण येत असल्याचं समोर आलं आहे.. तज्ज्ञांचा एक वर्ग याला न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर मानत आहे. यावरून हे स्पष्ट झाले आहे की दीर्घकाळापर्यंत कोविडचा न्यूरो सिस्टमवरही परिणाम होऊ लागला आहे.
Long Covid Symptoms : आवाजाशी चेहऱ्याचा मेळ जुळत नाही
अमेरिकन मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, ज्या लोकांना लाँग कोविडची लागण झाली आहे. त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे चेहरे ओळखण्यात अडचण येत आहे. ते आवाज ओळखू शकतात, पण आवाजासोबत दिसणारा चेहऱ्याशी त्यांची ओळख जुळत नाही. एका रुग्णानं सांगितलं की, त्याला त्याच्या वडिलांचा आवाज ऐकू येत होता. पण ज्या व्यक्तीकडून हा आवाज येत होता, ती व्यक्ती परिचयाची नव्हती आणि ही व्यक्तीच त्याचे वडील होते. संशोधनात समोर आलेली ही बाब अत्यंत धोकादायक आहे.
Long Covid Symptoms : पूर्वी लाँग कोविडची फक्त 'ही' लक्षणे होती
सायन्स डायरेक्ट जर्नलमधील संशोधनानुसार, कोविड-19 अजूनही हृदय, फुफ्फुस, किडनी, त्वचेवर परिणाम करत आहे. पण नवीन अहवालानुसार, कोरोनाचा आता मेंदूच्या न्यूरो सिस्टमवर परिणाम होऊ लागला आहे. तज्ज्ञांच्या मते, या स्थितीला चेहऱ्याचं अंधत्व म्हणजेच फेस ब्लाइंडनेस किंवा प्रोसोपॅग्नोसिया असं म्हणतात. त्यामुळे चेहरे ओळखण्याची क्षमता कमी होते.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )