Shradhha Walkar Case : नार्को टेस्टमध्ये आफताबनं सांगितल्या धक्कादायक गोष्टी; श्रद्धाच्या हत्येसाठी अनेक शस्त्रं वापरल्याची कबुली
Aftab Poonawalla Narco Test: एफएसएलच्या तज्ज्ञ पथकाकडून आफताबची आज नार्को टेस्ट करण्यात आली. या नार्को टेस्टमध्ये आफताबने श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली आहे.
![Shradhha Walkar Case : नार्को टेस्टमध्ये आफताबनं सांगितल्या धक्कादायक गोष्टी; श्रद्धाच्या हत्येसाठी अनेक शस्त्रं वापरल्याची कबुली Shradhha Walkar Murder Case aftab poonawala narco test in delhi latest marathi news Shradhha Walkar Case : नार्को टेस्टमध्ये आफताबनं सांगितल्या धक्कादायक गोष्टी; श्रद्धाच्या हत्येसाठी अनेक शस्त्रं वापरल्याची कबुली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/7b447ced2e293c13332206fe49aab4eb1669794058598272_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aftab Poonawalla Narco Test: श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हत्या प्रकरणात रोज नवीन काहीतरी घडत आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. आज श्रद्धाच्या हत्येतील आरोपी आफताबची नार्को टेस्ट झाली. दिल्लीतील रोहिणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये एफएसएलच्या तज्ज्ञ पथकाकडून आफताबची आज नार्को टेस्ट करण्यात आली. या नार्को टेस्टमध्ये आफताबने श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली आहे.
आज झालेल्या या नार्को टेस्टमध्ये आरोपी आफताबने श्रद्धाचा मोबाईल कुठं फेकला आणि श्रद्धाची जेव्हा हत्या केली, त्यावेळीचे तिचे कपडे कुठे फेकले, याचं उत्तरही दिले. तसेच श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी कोणती शस्त्रे वापरली आणि ती कुठे फेकली, याचा खुलासाही आफताफने केला. दरम्यान, पोलिसांनी आफताबने सांगितलेल्या ठिकाणाहून श्रद्धाचा मोबाईल आणि कपडे जप्त केले तर या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळेल, असे मानले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा वालकर खून प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला नार्को चाचणीदरम्यान वारंवार बेशुद्ध पडत होता. दरम्यान, आरोपीने श्रद्धाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याची कबुली दिली आहे. श्रध्दाच्या मोबाईलबद्दल त्याला विचारले असता, तिने फोन कुठेतरी फेकून दिल्याचे आरोपीने सांगितले. त्याने करवतीचा वापर करून श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची कबुली दिली. खून प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, या प्रश्नावर आफताबने हे कृत्य एकट्याने केल्याचं सांगितलं.
नार्को टेस्ट दरम्यान आरोपी आफताबने श्रद्धाचा मृतदेह जंगलात लपवल्याचं देखील मान्य केलं. श्रद्धाच्या मृतदेहाचा डोक्याचा भाग कुठं फेकला असं विचारलं असता आफताबनं पोलिसांना याबाबत सांगितलं आहे असं म्हटलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आफताबनं पॉलीग्राफ टेस्ट आणि नार्को टेस्टमध्ये अनेक प्रश्नांची समसमान उत्तरे दिली.
आता आफताबच्या नार्को टेस्टनंतर पोलिसांच्या तपास अधिक व्यापक होऊ शकतो. नार्को चाचणीदरम्यान आरोपी आफताबनं रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचे सांगितले. आज सकाळी 8.30 च्या सुमारास दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताबला रोहिणी येथील बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नार्को चाचणीसाठी नेले. सकाळी 10 वाजता ही नार्को चाचणी सुरू झाली आणि ती पूर्ण होण्यास सुमारे दोन तास लागले. नार्को चाचणीदरम्यान आरोपीने बहुतांश प्रश्नांची उत्तरे इंग्रजीत दिली.
ही बातमी देखील वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)