Shraddha Murder Case: गुजरात, हिमाचल आणि MCD मध्ये कोण जिंकतय? श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबला राजकारणात रस?
Shraddha Murder Case : तिहार तुरुंगात बंद असलेल्या आफताबने गुजरात विधानसभा आणि एमसीडी निवडणुकीत रस दाखवला.
Shraddha Murder Case : श्रद्धा हत्याकांडातील (Shraddha Murder Case) आरोपी आफताब पूनावालाला सध्या राजकारणात रस आहे का? असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. कारण गुजरात आणि एमसीडीमध्ये झालेल्या निवडणुकांची माहिती घेण्यासाठी त्याने 'गुजरात, हिमाचल आणि MCD मध्ये कोण जिंकत आहे?' असा प्रश्न केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिहार तुरुंगात बंद असलेल्या आफताबने गुजरात विधानसभा (Gujarat Elections) आणि एमसीडी निवडणुकीत रस दाखवल्याचं समोर येतंय. आफताबने जेलच्या बाहेर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांकडून या संदर्भात माहिती मागितली असल्याचं बोललं जातंय
आफताबला राजकारणात रस?
श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब गुजरात, हिमाचल आणि एमसीडी निवडणुकीतही रस घेत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने तिहार तुरुंगातील त्याच्या कोठडी बाहेर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांशी बराच वेळ चर्चा केली, एक्झिट पोलनुसार गुजरात आणि एमसीडीमध्ये कोणाची सरकार येणार आहे? याबाबत त्याने अनेक प्रश्न विचारले.
सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत निवडणुकीबाबत चर्चा
माध्यमात सुरू असलेल्या बातम्यांनुसार, श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत निवडणुकीबाबत चर्चा करत असतो. पोलीस अधिकाऱ्यांनाही त्यांनी निवडणुकीबाबत अनेक प्रश्न केले. खुनाच्या गुन्ह्यात तो तुरुंगात आहे हे त्याला माहीत असूनही तो सामान्य जीवन जगत आहे. गुजरात आणि एमसीडीमध्ये निवडणुकीनंतर कोणाचे सरकार येते आणि कोण जिंकते? अशी चर्चा तो करत राहतो.
'पॉलीग्राफ' आणि 'नार्को' चाचण्या.. पोलिस चौकशीदरम्यान समान उत्तरे
श्रद्धा वालकर हत्येचा सध्या तपास सुरू आहे. आरोपी आफताब अमीन पूनावाला याने त्याच्या 'पॉलीग्राफ' आणि 'नार्को' चाचण्या आणि पोलिस चौकशीदरम्यान समान उत्तरे दिली. या संदर्भात पोलीस सूत्रांनी यापूर्वी सांगितले होते की, नार्को तपासादरम्यान पूनावाला याने पोलिसांना सांगितले की, त्याने श्रध्दा वालकरच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी चाकूचा वापर केला होता. हत्येसाठी वापरलेली करवत त्याने गुडगाव येथील कार्यालयाजवळ ठेवली होती. त्यानंतर त्याने झुडुपांमध्ये कुठेतरी फेकून दिली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनावाला यांनी श्रद्धाचे डोके मेहरौलीच्या जंगलात आणि मोबाईल फोन मुंबईतील समुद्रात फेकून दिल्याचे सांगितले. पूनावाला याने 14 दिवसांच्या पोलिस कोठडीत दिलेले वक्तव्य हे त्याच्या 'पॉलीग्राफ' आणि 'नार्को' चाचण्यांदरम्यान विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांसारखेच आहे.
आफताबला तिहारमध्ये वेगळे ठेवण्यात आले
आफताबला तिहारमधील इतर कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे, परंतु त्याच्या सेलमध्ये काही कैदीही आहेत. याआधी आफताबला आंबेडकर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, या सुनावणीदरम्यान आफताबला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे
दरम्यान, आफताबने मे महिन्यात त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकर (27) हिचा गळा दाबून हत्या केली होती. या हत्येनंतर, त्याच्या मृतदेहाचे 35 तुकडे करण्यात आले आणि दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्याच्या घरी 300 लिटरच्या फ्रीजमध्ये सुमारे तीन आठवडे ठेवण्यात आले. एवढेच नाही तर आरोपी आफताबने अनेक दिवसांपासून श्रद्धाच्या शरीराचे अवयव शहराच्या विविध भागात फेकून दिले होते.