एक्स्प्लोर
भाजप मुख्यालयात भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला बूट फेकून मारला, डॉक्टर ताब्यात
दिल्लीतल्या भाजपच्या मुख्यालयामध्ये भाजपचे नेते जीव्हीएल नरसिम्हा राव पत्रकार परिषद घेत होते. त्याचवेळी त्यांच्या दिशेने शक्तीने बूट भिरकावल्याने पत्रकार परिषदेत एकच खळबळ उडाली.
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये भाजप कार्यालयात आयोजित एका पत्रकार परिषदेत भाजपचे ज्येष्ठ नेते जीवीएल नरसिम्हा राव यांच्यावर एका डॉक्टरने बूट फेकून मारला. भाजप नेते भूपेन्द्र यादव आणि जीव्हीएल नरसिम्हा राव एक पत्रकार परिषद घेत होते त्यावेळी डॉक्टर शक्ती भार्गव याने त्यांच्यावर बूट फेकून मारला. शक्ती भार्गव हा कानपूरचा रहिवाशी आहे. बूट मारल्यानंतर शक्ती भार्गवला लगेच ताब्यात घेण्यात आले.
VIDEO | भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारली | नवी दिल्ली | एबीपी माझा
आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास दिल्लीतल्या भाजपच्या मुख्यालयामध्ये भाजपचे नेते जीव्हीएल नरसिम्हा राव पत्रकार परिषद घेत होते. त्याचवेळी त्यांच्या दिशेने शक्तीने बूट भिरकावल्याने पत्रकार परिषदेत एकच खळबळ उडाली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी शक्तीला पकडून त्याला मारहाण देखील केली.
शक्ती भार्गव हा पेशाने डॉक्टर आहे. डॉक्टरी बंद करुन तो बिल्डर झाला असल्याची माहिती आहे. दरम्यान मला बूट लागलेला नाही. मात्र या प्रकरणाची माहिती घेतली जाईल अशी प्रतिक्रिया जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
महाराष्ट्र
राजकारण
भारत
Advertisement