एक्स्प्लोर

Sanjay Raut Arrest : संजय राऊत यांच्या अटकेचे संसदेत पडसाद उमटणार? राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस

Sanjay Raut Arrest : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या अटकेचे पडसाद संसदेत उमटण्याची शक्यता आहे. शिवसेनेने राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे.

Sanjay Raut Arrest : राज्यातील महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या (Sanjay Raut Arrested) अटकेचे पडसाद संसदेत उमटण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसने राऊत यांना पाठिंबा दर्शवला आहे. लोकसभेत शिवसेनेसह काँग्रेसही अटकेच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. 

शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सांगितले की, नियमानुसार संजय राऊत यांच्या अटकेबाबत स्थगन प्रस्तावाची नोटीस राज्यसभेत दिली आहे. भाजपच्या इशाऱ्यावर केंद्रीय यंत्रणा बेलगामपणे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केली आहे. संजय राऊत हे शिवसेनेचे संसदेतील गटनेते, ज्येष्ठ खासदार आहेत. त्यांना संसदेचे अधिवेशन सुरू असताना अटक करण्यात आली आहे. संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर चौकशीसाठी बोलवा, मी येईन असं वारंवार ते सांगत होते. मग तरी ही घाई का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

हा 'नवीन भारत' असल्याचे भाजपवाले सांगतात. पण नव्या भारतात कारवाई केवळ फक्त विरोधकांवर का होतात असा प्रश्नही प्रियांका चतुर्वेदी यांनी उपस्थित केला. ईडी म्हणजे भाजपचे एक विस्तारीत अंग असल्याचा आरोप त्यांनी केला. हेमंत विश्व शर्मा भाजपमध्ये आले तर त्यांच्या विरोधातल्या सगळ्या ईडी कारवाया बंद झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. 

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी,  खासदार राहुल गांधी यांनादेखील ईडीने बोलावले. तर, तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवरही ईडीची कारवाई झाली. राजकीय हेतूने सुरू असलेल्या कारवाईविरोधात आम्ही त्यांच्या पाठिशी उभे राहिलो. त्यामुळे आता आमच्या पाठिशीदेखील सर्वजण उभे राहतील ही अपेक्षा असल्याचे प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटले. 

काँग्रेस राऊत यांच्या पाठिशी

काँग्रेसदेखील संजय राऊत यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांनी ट्विट करुन राऊत यांना पाठिंबा दर्शवला आहे.  भाजपच्या दबावाच्या राजकारणापुढे न झुकल्याची शिक्षा राऊतांना मिळतेय असं चौधरी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. संजय राऊत हे धाडसी आणि धैर्यवान व्यक्ती असल्याचंही चौधरी यांनी म्हटलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केलाPresident Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Embed widget