Shiv Jayanti Live Updates : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवनेरीवर शिवजन्मोत्सव, राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह
Shivjayanti Live Updates : आज छत्रपती शिवाजी महाराज यांची (Shiv Jayanti) 394 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. शिवजयंती सोहळ्याचे राज्यासह देशातील अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचा...
LIVE
Background
Shiv Jayant Celebration Live Updates : आज तारखेनुसार, छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. या दिवशी अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचे आयोजन केले जाते. यावर्षी, छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. शिवजयंती सोहळ्याचे राज्यासह देशातील अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचा...
Yavatmal Shiv Jayanti : शिवजयंती निमित्ताने बाईक रॅली, युवक-युवतींचा मोठया प्रमाणात सहभाग
Yavatmal News : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशभरात साजरी केली जात आहे. आज शिवजयंती निमित्त यवतमाळमध्ये शिवतीर्थ येथून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या बाईक रॅलीत शिवभक्तांनी पारंपारीक पद्धतीने भगवे फेटे परिधान करून हातात भगवे ध्वज घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत रॅलीत सहभागी झाले. शहराच्या विविध भागातून ही रॅली काढण्यात आली. शिवजयंती निमित्ताने संपूर्ण शहर भगवेमय झाले होते.
Mahuli Gad Shiv Jayanti : किल्ले माहुली गडावर शेकडो महिलांकडून गडपूजन
Shiv Jayanti 2024 : हिदुस्थानचे आरध्य दैवत स्वराज्य निर्माते राजे शिवाजी महाराज यांच्या जंयती जल्लोषात साजरी करण्यासाठी अवघी शहापूर नगरी सज्ज झाली आहे. शिवजयंती उत्सव समिती आणि ग्रामस्थ मंडळ आसनगाव यांनी राजांना मानवदंना देण्यासाठी अनोखा उपक्रम हाती घेतला. आसनगावमधील शेकडो महिलांनी राजमाता जिजाबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गर्भसंस्कार भूमी असलेल्या किल्ले माहुली गडाच्या पायथ्याशी पूजन करुन राजमाता आणि राजे शिवाजी महाराजांचा जयघोष केला. यावेळी महिलांसाठी प्रेरणादायी व्याख्यान देखील आयोजित केले होतं.
Ahmednagar News : गहू पेरणी करत युवक शेतकऱ्याने साकारली छत्रपतींची प्रतिकृती Dron Vis
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील लोणी या गावातील कुणाल विखे या युवा शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये गहू बी उगवून त्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतीकृती साकारलीय. त्यासाठी 10 दिवसांचा कालावधी लागला असून सुरुवातीला शिवरायांची रांगोळी मध्ये प्रतीकृती साकारली त्यांनंतर त्यामध्ये गहू टाकून त्यास पाणी दिले. गहू उगवून येण्यासाठी 7 ते 8 दिवसांचा कालावधी लागलाय. या प्रतिकृतीची लांबी 24 फूट आहे आणि रुंदी 20 फूट आहे. यासाठी 15 किलो गव्हाचा वापर करण्यात आला.
Sindhudurg Fort Shiv Jayanti : शिवराजेश्वर मंदिरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी
सिंधुदुर्ग : महाराष्ट्रातील छञपती शिवाजी महाराजांचं एकमेव शिवराजेश्वर मंदिरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करणार आली. मालवण मधील सिंधुदुर्ग किल्ल्यावर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेत शिवजयंती साजरी केली, यावेळी मोठ्या संख्येने शिव भक्त उपस्थित होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने पर्यटक देखील सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देत आहेत.