एक्स्प्लोर
मदरशांमध्ये दहशतवादाचं ट्रेनिंग, शिय्या वक्फ बोर्डच्या अध्यक्षांचं पंतप्रधानांना पत्र
मदरशांमध्ये दहशतवादाचं ट्रेनिंग दिलं जात असल्याचा दावा खुद्द शिय्या वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केला आहे.
लखनऊ : मदरशांमध्ये दहशतवादाचं ट्रेनिंग दिलं जात असल्याचा दावा खुद्द शिय्या वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केला आहे. विशेष म्हणजे, रिझवी यांनी याबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, यात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
रिझवी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, “मदरशांना बांगलादेश आणि पाकिस्तान सारख्या राष्ट्रांमधून पैसे मिळतात. काही दहशतवादी संघटना या बेकायदेशपणे चालणाऱ्या मदरशांना फंडिंग करतात. मुस्लीम वस्तीतील सर्वाधिक मदरशांना सौदी अरेबियातून पैसे येतात. तसेच, या मदरशांमधून मुलांना योग्य ते शिक्षण मिळत नसल्याने, ते दहशवादाकडे वळतात."
रिझवींनी पुढे लिहिलंय की, "शिमुली आणि लालगोला मुर्शिदाबादमध्ये महिलांना बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. शिवाय, मदरशांमधून दिलं जाणारं शिक्षण हे त्यांचं भविष्य योग्यप्रकारे घडवण्यासाठी योग्य नसतं. त्यामुळे धर्मनिरपेक्ष शिक्षण पद्धतीसाठी मदरशांचं रुपांतर शाळांमध्ये केलं पाहिजे. तसेच, जे नोंदणीकृत मदरसे नाहीत, ते तात्काळ बंद केले पाहिजेत.”
दुसरीकडे, या पत्रानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी रिझवी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. "रिझवी हे सर्वात मोठे जोकर आणि स्वार्थी व्यक्ती आहेत. त्यांनी आपली आत्मा आरएसएससाठी विकली आहे. त्यांनी शिय्या आणि सुन्नींच्या कोणत्याही मदरशांमधून अशा प्रकारचं शिक्षण दिलं जात असल्याचं सिद्ध करावं, याचं मी त्यांना आव्हान देतो. तसेच, त्यांच्याकडे, याबाबत पुरावे असतील, तर त्यांनी तात्काळ गृहमंत्र्यांना द्यावेत.”
दरम्यान, मदरशांसदर्भातील वादानंतर, सरकारने मदरशांविरोधात कोणताही निर्णय घेतला नसल्याचं भाजपने स्पष्ट केलं आहे.
रिझवी यांच्या मते, देशभरात एक लाखापेक्षा जास्त मदरसे आहेत. जे पूर्णपणे बेकायदेशी आहेत, आणि त्यांची नोंदणी झालेली नाही. दरम्यान, यापूर्वीदेखील मदरशांमधील शिक्षण पद्धतीवरुन प्रश्न उपस्थित केले जात होते. पण आता शिय्या वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांनीच मदरशांचा संबंध दहशतवादाशी जोडून नवा वाद उपस्थित केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement