एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शरद पवारांना 'पद्मविभूषण' प्रदान, पवार कुटुंबीय भावुक
नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना 'पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनमध्ये झालेल्या सोहळ्यामध्ये हा क्षण याची देही याची डोळा पाहण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे भावुक झाल्याचं कॅमेऱ्यानं टिपलं.
शरद पवार यांना लोककार्यासाठी पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलं. पवारांसोबतच एकूण 70 सन्मानार्थींना पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रपती प्रणब मुखर्जींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले.
तेहम्तन उद्वाडिया यांचा ‘पद्मभूषण’ने गौरव करण्यात आला. ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, प्रख्यात गायक के जे येसूदास यांचाही पद्मविभूषणने सन्मान करण्यात आला आहे. सात जणांना पद्मविभूषणने गौरवण्यात आलं आहे, तर सात जण पद्मभूषणचे मानकरी ठरले आहेत.
‘पद्मश्री’च्या यादीत क्रिकेटपटू विराट कोहलीसह कुस्तीपटू साक्षी मलिक आणि जिम्नॅस्ट दीपा कर्माकर यांचा समावेश आहे. दृष्टीहीन क्रिकेटपटू शेखर नाईक, पॅरालिम्पिकपटू दीपा मलिक, हॉकीपटू पी आर श्रीजेश यांचाही पद्मश्रीने गौरव झाला आहे.
अप्पासाहेब धर्माधिकारी यांचं सामाजिक कार्यातील योगदान लक्षात घेऊन त्यांचाही सन्मान पद्मश्रीने करण्यात आला आहे. गायक कैलाश खेर, सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचाही पद्मश्रीने सन्मान झाला आहे. चित्रपट समीक्षक भावना सोमय्या आणि शेफ संजीव कपूर यांचाही पद्मश्रीने गौरव करण्यात आला आहे.
पद्मविभूषण
शरद पवार ( सामाजिक कार्य ) ( महाराष्ट्र )
मुरली मनोहर जोशी ( सामाजिक कार्य )
के जे येसूदास ( कला – संगीत )
सद्गुरु जग्गी वासुदेव ( इतर- अध्यात्म )
प्रा. उडिपी रामचंद्र राव ( विज्ञान आणि अभियांत्रिकी )
सुंदर लाल पटवा ( मरणोत्तर ) ( सामाजिक कार्य )
पीए संगमा ( मरणोत्तर ) ( सामाजिक कार्य )
पद्मभूषण
विश्व मोहन भट्ट ( कला – संगीत )
प्रा. डॉ. देवी प्रसाद द्विवेदी ( साहित्य आणि शिक्षण )
तेहम्तन उद्वाडिया ( वैद्यकीय ) ( महाराष्ट्र )
रत्नसुंदर महाराज ( इतर – अध्यात्म )
स्वामी निरंजन नंदा सरस्वती ( इतर – योग )
प्रिन्सेस महा चक्री सिरींधोर्न ( परदेशी ) ( साहित्य आणि शिक्षण ) (थायलंड)
चो रामस्वामी (मरणोत्तर) ( साहित्य आणि शिक्षण – पत्रकारिता )
पद्मश्री (महाराष्ट्रातील मानकरी)
कैलाश खेर ( कला – संगीत )
अनुराधा पौडवाल ( कला – संगीत )
भावना सोमय्या ( साहित्य आणि शिक्षण – पत्रकारिता )
संजीव कपूर ( इतर – पाककला )
अप्पासाहेब धर्माधिकारी ( सामाजिक कार्य )
डॉ. मापुस्कर (मरणोत्तर) ( सामाजिक कार्य )
पद्मश्री ( क्रीडा क्षेत्रातील मानकरी )
विराट कोहली ( क्रिकेट ) ( दिल्ली )
शेखर नाईक ( क्रिकेट ) ( कर्नाटक )
विकास गौडा ( थाळीफेक ) ( कर्नाटक )
दीपा मलिक ( अॅथलेटिक्स ) ( हरियाणा )
मरियप्पम थांगवेलु ( अॅथलेटिक्स ) ( तामिळनाडू )
दीपा कर्माकर ( अॅथलेटिक्स ) ( त्रिपुरा )
पी आर श्रीजेश ( हॉकी ) ( केरळ )
साक्षी मलिक ( कुस्ती ) ( हरियाणा )
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement