Sharad Pawar Petition : नाव आणि चिन्हाबाबतच्या शरद पवारांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी होणार सुनावणी
Sharad Pawar Petition : राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्षात फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाला दिले होते.
Sharad Pawar Petition : राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्षात फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाला दिले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि नाव अजित पवारांना देण्याविरोधात शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी (Sharad Pawar) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सोमवारी (दि. 19) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
सेटलमेंट करुन पक्ष आणि चिन्ह घेतले
मी अनेकदा वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढलो आहे. एखाद्याला वाटेल की, चिन्ह काढून घेतले तर अस्तित्व काढून घेऊ मात्र, तसे होत नाही. नवीन चिन्ह आपल्याला मिळेल. ते लोकांपर्यंत पोहोचवायच आहे. पक्ष आणि चिन्ह सेटलमेंट करुन घेण्यात आलं आहे, असा आरोप शरद पवारांनी केला होता. पुढील काळात आपल्यावर अन्याय होणार निर्णय घेतले जातील. मात्र, आपल्याला पुढची तयारी करायची आहे, त्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असल्याचे शरद पवार म्हणाले होते.
#MentioningsToday
— Live Law (@LiveLawIndia) February 16, 2024
Sharad Pawar seeks urgent listing in light of the Election Commission's Order recognising Ajit Pawar's Faction as the Real NCP
Sr Adv Manu Singhvi: Sharad Pawar will likely have to face the whip issued by Ajit Pawar ....no party symbol has been issued to me… pic.twitter.com/0JgyR1jlW7
पक्ष कोणी स्थापन केला, संपूर्ण देशाला माहिती आहे : शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी स्थापन केला, हे संपूर्ण देशाला माहिती आहे. तरी देखील पक्ष दुसऱ्यांदा देण्यात आला हे अन्यायकारक आहे. आयोगाचा निकाल अन्यायकारक आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वेगळा निर्णय देणार नाहीत, याची खात्री होती. शिवसेनेबाबतही असाच निर्णय देण्यात आला होता. त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले होते.
जितेंद्र आव्हाडांना पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार
पुढे बोलताना शरद म्हणाले की, जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) राष्ट्रवादी पक्षात काम करतात. त्यांनी देश आणि राज्य पातळीवर काम केले आहे. यापूर्वी ते मंत्री होते. आव्हाड यांना पक्षाची भूमिका मांडण्याच संपूर्ण अधिकार आहे. त्यांनी काय बोलावे याबाबत मार्गदर्शन करण्याची अन्य लोकांना गरज नाही, असा टोलाही शरद पवार यांनी धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या
Eknath Shinde : मी बाप आणि नवरा म्हणून अपयशी ठरलोय, श्रीकांतने माझे डोळे उघडले : एकनाथ शिंदे